हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने निराशा

यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात अडीच ते तीन हजार रुपयांची प्रतिक्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. हळदीचे भाव पाच वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत.
हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने निराशा The price of turmeric, Disappointment with the decline in production
हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने निराशा The price of turmeric, Disappointment with the decline in production

नागपूर : यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात अडीच ते तीन हजार रुपयांची प्रतिक्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. हळदीचे भाव पाच वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी २०२१मध्ये देशात ठोक बाजारात हळदीचा भाव आठ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या वर पोहचला आहे. 

देशात हळदीचे प्रमुख उत्पादक राज्य असलेल्या तेलंगणात हळदीचे क्षेत्र घटले आहे. तेलंगणात २०१९-२० मध्ये ०.५५ लाख हेक्टरमध्ये हळदीची लागवड झाली होती. यंदा त्यात घट झालेली आहे. तसेच राज्यातही लागवड कमी झाली. राज्यातही अवेळी आलेल्या पावसामुळे हळदीचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटलेले आहे.

मागणी वाढल्याने हळदीचे भाव अचानक वाढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशातही मोठ्या प्रमाणात हळदीची मागणी वाढलेली असल्याने निर्यातही वाढलेली आहे. २०२०-२१ मध्ये ०.४५ लाख हेक्टरमध्ये हळदीची लागवड झाली असल्याची माहिती आहे. खराब हवामानामुळे उत्पादनावर बराच परिणाम झाला आहे. बाजार समितीमध्ये हळदीला आताच्या हंगामात चांगला भाव मिळताना दिसत आहे. मागील चार-पाच वर्षांत हळदीचे उत्पादन जास्त झाल्याने दर कमी होते. यंदा उत्पादन कमी झाल्याने भाव वाढलेले आहेत.

हळदीमध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे कोरोना काळात हळदीचे महत्त्व आणि वापर वाढला आहे. सध्या भारतात आणि परदेशात अँटिबायोटिक म्हणून हळदीचा वापर केला जात असल्याने हळदीच्या पावडरची मागणी  वाढली आहे, अशी माहिती व्यापारी प्रकाश वाधवानी म्हणाले. 

मागणीत तेजी  शेतकरी हळदीसाठी १० हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भावाची मागणी करीत आहेत. लॉकडाउन खुले झाल्यानंतर हळदीच्या मागणीत तेजी आली आहे. २०२०मध्ये लॉकडाउनमुळे मागणी घटली होती. यंदा लागवड कमी झाल्याने भाव वाढले आहे, असे व्यापारी प्रकाश वाधवानी यांनी सांगितले. 

शेतकरी, व्यापाऱ्यांना  मोठा दिलासा  हळदीच्या सौद्यात हळदीला ऐतिहासिक ३० हजार प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला आहे. आतापर्यंतचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे. त्यामुळे शेतकरी, हळद व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनामुळे हळदीचे महत्त्व वाढले आहे. देशांतर्गत आणि परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर हळदीची निर्यात होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com