पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१)भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक, मागणी, पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.
Prices of all vegetables in Pune are stable
Prices of all vegetables in Pune are stable

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१)भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक, मागणी, पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये उत्तर प्रदेश राजस्थानसह मध्य प्रदेशातून सुमारे १२ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ५ ट्रक, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानहून १० टेम्पो गाजर आणि मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, कोबी ८ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, तांबडा भोपळा ८ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, कांदा नवीन आणि जुना सुमारे १७० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर व स्थानिक भागांतून ३५ ट्रक बटाटा आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - कांदा : २२०-२७०, बटाटा : ८०-१६०, लसूण : ५००-१०००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २५०-३००, गवार : ३५०-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : १८०-२२०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ३०-५०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : १६०- २००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१५०, शेवगा : ४५०-५५०, गाजर : १४०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : ४०-६०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : १५०-१६०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-२४०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख, तर मेथीची ५० आणि हरभऱ्याच्या ३५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ६००-१०००, शेपू : ४००-६००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-७००, पुदिना : १५०-२५०, अंबाडी : ६००-७००, मुळे : ३००-८००, राजगिरा : ५००-७००, चुका : ७००-८००, चवळई : ६००-७००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी - ३००-६००.

फळबाजार फळबाजारात लिंबांची सुमारे २ हजार गोणी, संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे २० टन, डाळिंब २० टन, पपई २० टेम्पो, चिकू सुमारे १ हजार गोणी, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी सुमारे १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ३५० गोणी, पेरू ६०० क्रेट , स्ट्रॉबेरी १० टन आवक झाली होती. तर  द्राक्षांची बारामती, फलटण, सांगली, इंदापूर आणि पंढरपूर भागांतून २५ टन आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-६५०, मोसंबी : (३ डझन) : जुना ३२०-६००, नवीन २३०-३६० (४ डझन) : जुना १३०-२००, नवीन १००-१८० संत्रा : (१० किलो) : २००-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२५०, गणेश : २०-८०, आरक्ता ३०-१००. कलिंगड : ५-१५ खरबूज : १५-२२, पपई : ५-१२, चिकू (१० किलो) : १००-७००, बोरे (१० किलो)- चमेली २००-३००, उमराण ८०-१५०, चण्यामण्या ३५०-५००, चेकनेट २००-३००. स्ट्रॉबेरी (२ किलो) ८०-१५०. पेरू (२० किलो) - ३५०-६००. द्राक्षे - जम्बो (१० किलो) ६००-१०००, सोनाका (१५ किलो) ७००-११००. सुपर सोनाका (१५ किलो) ८००-१३००.

फुलबाजार गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम गुलछडी आणि लिलीच्या उत्पादनावर झाला आहे. थंडीमुळे या फुलांची आवक घटली आहे. प्रजासत्ताक दिनामुळे फुलबाजारास सुट्टी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुढील दोन दिवस फुलांची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी सागर भोसले यांनी वर्तविली आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-४०, गुलछडी : ८०-१२०, अस्टर : (५ जुड्या) ३-६, सुटा ४०-६०, कापरी : १०-३०, सुटा कागडा : १५०-२००, शेवंती : ५०-१००, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-३०, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ८०-१२०,  लिली बंडल : १०-१२, जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-८०, शेवंती काडी १००-१५०, लिलियम (१० काड्या) ८००-१५००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : २०-४०.

मटण, मासळीला वाढली मागणी मटण, मासळीला मागणी वाढली आहे. मासळीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मटणाला मागणी वाढल्याने दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकनची मागणी ३० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे चिकनच्या दरात १० रुपयांनी घट झाली आहे. इंग्लिश व गावरान अंड्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी व प्रभाकर कांबळे यांनी दिली. गणेश पेठेतील मासळीबाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ४०० किलो तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००, मध्यम : १०००,  लहान- ७८००, भिला : ५५०, हलवा : ५५०, सुरमई : ५५०, रावस : लहान ६००,  मोठा : कट ७५०, घोळ : ६००, भिंग : ४००, करली : २८०-३२०, करंदी : सोललेली ४८०, पाला : लहान ८००, मोठे : १२००-१४००, वाम :  लहान ६५०, मोठी ९००, ओले बोंबील : २००,

कोळंबी ः लहान २८०-३२०, मध्यम ४८०, मोठे ६००, जंबोप्रॉन्स : १२००-१४००  किंगप्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १२००, मोरी : ३२०-३६०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : २००, खेकडे : लाल २००, चिंबोऱ्या : ६००.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २८०, नगली : लहान ४००, मोठी ७००, तांबोशी : ४८०, पालू : ३६०, लेपा : लहान १२०, मोठे २४०, बांगडा : लहान २००, मोठे २४०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०  तिसऱ्या : २४०,  तारली : १८०-२००

नदीची मासळी : रहू :१४०-१६०, कतला :१६०, मरळ : ४४०, शिवडा : २४०, खवली : २४०, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ५५०.

चिकन : चिकन : १६०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २६०.

अंडी : गावरान : शेकडा : ७३०, डझन : १००, प्रति नग : ८.५०,  इंग्लिश : शेकडा : ४३०, डझन : ६०, प्रतिनग : ५.

मटण : बोकडाचे : ६६०, बोल्हाईचे : ६६०, खिमा : ६६०, कलेजी : ६६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com