Agriculture news in Marathi, The prices of chilli, guar and ladyfinger survive in Solapur | Agrowon

सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकून

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, भेंडीची आवक आणि दर दोन्ही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कांद्याचे दर मात्र पुन्हा एकदा वधारले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, भेंडीची आवक आणि दर दोन्ही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कांद्याचे दर मात्र पुन्हा एकदा वधारले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची रोज ३० ते ४० क्विंटल, गवारची रोज ५ ते १० क्विंटल आणि भेंडीची २० ते ४० क्विंटलपर्यंत आवक राहिली, ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. पण मागणी कायम असल्याने त्यांचे दर टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १००० रुपये, सर्वाधिक २५०० रुपये, गवारला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये आणि सदर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत दरातील किरकोळ चढ-उतार वगळता दरातील तेजी टिकून राहिली. त्याशिवाय कांद्याच्या दरात या सप्ताहात पुन्हा तेजी राहिली. कांद्याची आवकही तशी १० ते २० गाड्या जेमतेम होती. कांद्याची आवक मात्र बाहेरून झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. या सप्ताहात त्याच्या दरात जवळपास ५०० रुपयांच्या फरकाने वाढ झाली. कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत सध्या कमीच आहे. पण मागणीतील सातत्य आणि आवकेतील घट कायम राहिली. तर कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

ढोबळी मिरची, वांगी यांचे दर मात्र पुन्हा स्थिर राहिले. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये आणि वांग्याला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय घेवडा आणि काकडीलाही बऱ्यापैकी उठाव मिळाला. घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३२०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये तर काकडीला किमान ७०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
विक्री केंद्रांद्वारे सेंद्रिय भाजीपाला...हिंगोली : ‘‘मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी...
हिंगोलीत व्यापारी, खासगी बॅंकांकडून १५...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता....
पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून...औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन...
सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख...सोलापूर  : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे...
सोलापूर जिल्हा भूमि अभिलेखने मिळवला ३०...सोलापूर  : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसआरआय`ने होणार...सिंधुदुर्ग : राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि...
दुधात नफा नव्हे; उत्पादन खर्चातच पाच...नगर ः दूध व्यवसाय टिकण्याचा कितीही प्रयत्न केला...
पुणे जिल्ह्यात युरिया टंचाईपुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असल्याने...
अकोल्यात सोयाबीन बियाणेप्रकरणी २९५७...अकोला ः जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची उगवण न...
जत पूर्व भागात पेरलं; पण उगवलंच नाहीउमदी, जि. सांगली : एकीकडे कोरोनाचे थैमान; तर...
वैरागमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणे...सोलापूर  : सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे...
जळगावात लॉकडाउनमुळे खते गेली परतजळगाव ः जिल्ह्यात खतांची टंचाई आहे. यातच जळगाव,...
यवतमाळ जिल्ह्यात पेरणीनंतर मिळणार बियाणेयवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे...
जळगावच्या पूर्व भागात पावसाचा लहरीपणाजळगाव ः जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्क्यांवर पाऊस...
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी अध्यादेश...नाशिक : केंद्र सरकारने अलीकडेच शेतीसंबंधी तीन...
पीकविमा योजनेच्या निकषांत बदल गरजेचा ः...नांदेड : इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नांदेड...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...