agriculture news in marathi The prices of Ghosale, Wangi and Karalya have gone up in the city | Agrowon

नगरमध्ये घोसाळे, वांगी, कारल्याचे दर वधारले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 जून 2021

 नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. आठवडाभरात घोसाळ्याला २ हजार ते ४ हजार, वांग्यांना प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते ४ हजार, कारल्याला १ हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला.

 नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. आठवडाभरात घोसाळ्याला २ हजार ते ४ हजार, वांग्यांना प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते ४ हजार, कारल्याला १ हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. दर वधारले असले तरी त्यात सतत चढ-उतार होत आहे.

येथील बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात वाढली. टोमॅटोची १३२ ते १३५ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२००, वांग्यांची १५ ते २० क्विंटलची आवक, तर दर १ हजार ५०० ते ४ हजार ५००, फ्लॉवरची ५१ ते ६० क्विंटलची आवक होऊन ९०० ते ३ हजार ५००, कोबीची ७९ क्विंटलची आवक होऊन ५०० हजार १५०० रुपये, काकडीची १० ते १३ क्विंटलची आवक होऊन ४०० ते १ हजार ५००, गवारची ९ ते १०० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६ हजार रुपयांचा दर मिळाला. 

दोडक्याची ८ ते १० क्विंटलची आवक, तर दर  १ हजार ५०० ते ४ हजार ५००, भेंडीची ३३ ते ३५ क्विंटलची आवक, तर दर २ हजार ते ३ हजार ५००, वाल शेंगांची २ ते ३ क्विंटलची आवक, दर ४ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. लसणाची ३ ते ५ क्विंटलची ४ हजार ५०० ते ७ हजार, हिरव्या मिरचीची ३५ ते ४० क्विंटलची आवक, दर २ हजार ते ३ हजार ५००, शेवग्याची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन ५ हजार ६०० हजार रुपये दर मिळाले. 

आल्याची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ८००, शिमला मिरचीची ३५ ते ४२ क्विंटलची आवक होऊन १ हजार ४०० ते ३ हजार २०० हजार रुपयांचा दर मिळाला. बटाट्याची ७० ते ८० क्विंटलची आवक होऊन १००० ते १५०० रुपयांचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, करडी भाजी, शेपूचीही आवक बऱ्यापैकी होती.

ज्वारीची आवक वाढली

गेल्या आठवडाभरात नगर बाजार समितीत भुसारची आवक १५०० ते ३१०० रुपये व सरासरी २२०० रुपयाचा दर मिळाला. हरभरा, बाजरी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, गव्हाची आवकही वाढली आहे. चिंचेची आवक सुरु आहे. ३००० ते ५३०० रुपयांचा दर मिळत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...