बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर

पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली. मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते.
 Prices of most vegetables are stable
Prices of most vegetables are stable

पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली. मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. भाजीपाल्याच्या आवकेत परराज्यांतून आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश येथून ३ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ५ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून ५० गोणी तोतापुरी कैरी, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे १० ट्रक आवक झाली. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे २ हजार भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो सुमारे ८ हजार क्रेट्‌स, फ्लॉवर, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, स्थानिक मटार सुमारे ५० गोणी, भुईमूग शेंग ४० गोणी, कांदा ६० ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ५० ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे १० किलोचे भाव 

कांदा : नवीन १५०-२००, जुना २००-२५०, बटाटा : १५०-२००, लसूण : २५०-७००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २५०-३५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-३००, दुधी भोपळा: १००-१५०, चवळी: २००- २५०, काकडी : २५०-३००, कारली हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : १५०-२००, पडवळ: २५०-३००, फ्लॉवर: १००-१५०, कोबी : ८०-१५०, वांगी : २००-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल: १००-१२०, ढोबळी मिरची: १५०-४००, तोंडली: कळी ३००-३५०, जाड, १२०-१५०, शेवगा : ८००-१०००, गाजर २५०-३५०, वालवर १५०-२००, बीट: १५०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे: २००-२५०, भुईमूग शेग : ३५०-४५०, मटार : स्थानिक : ९००-११००, परराज्य -७५०-८५० पावटा: ३००-३५०, तांबडा भोपळा: ६०-१००, तोतापुरी कैरी : ४००-५००, सुरण: १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ: शेकडा १०००- १६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची १ लाख, तर मेथीची ८० हजार जुड्या आवक झाली.  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथींबीर : ६००-१०००, मेथी : ३००-६००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत: १०००-१२००, करडई: ५००-६००, पुदीना २००-३००, अंबाडी ८००-१०००, मुळे: १५००-२०००, राजगिरा: ४००-५००, चुका : ६००-८००, चवळई: ८००-१०००, पालक: ८००-१०००, हरभरा गड्डी - ८००-१००० 

फळबाजारात रविवारी (ता.२१) लिंबाची सुमारे तीन हजार गोणी, डाळिंबांची सुमारे २० टन, मोसंबी ७० टन, संत्रा १५ टन, पपई ४ टेम्पो, चिक्कू २ हजार गोणी, पेरूची सुमारे १ हजार २०० क्रेट, सीताफळ ३ टन, कलिंगड ३, तर खरबूज २ टेम्पो, अंजीर दीड टन, आणि विविध बोरांची सुमा ३५० गोणी आवक झाली. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ७०-२००, मोसंबी : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ६० -१२०, संत्रा : (१०किलो) : १२०-३००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ६०-८०, गणेश : १०-३०, आरक्ता २०-८०, कलिंगड : १८-२२, खरबूज : २५-३० पपई : १०-१३, चिक्कू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो): ३००-४००, सीताफळ ३०-२००. बोरे (प्रति १०  किलोचे दर) - चण्यामण्या ३५०-६००, चेकनट ४५०-५५०, उमराण ४०-७०, चमेली १५०-२००. 

फुलबाजार 

लग्नांचा हंगाम सुरू झाल्याने सजावटीसाठी लागणाऱ्या शोभेच्या फुलांची मागणी वाढली आहे. परिणामी, काही प्रमाणात त्यांच्या दरात वाढ झाली आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ४०-७०, अॅस्टर (५ जुड्या) ः १६-२०, सुटा ५०-१००, कापरी : ३०-५०, शेवंती : २०- ५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : ४०-७०, गुलछडी काडी : ५०-१५०, डच गुलाब (२० नग) : ७०-२५०,  जरबेरा : ७०-१००, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १५०-३००, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लडिओ (१०  काड्या) : ५०-१००, जुई  १०००-१२०० चमेली ७००-८००.

मटण-मासळी 

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२१) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीतील मासळीची सुमारे २०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन १५ टन आवक झाली. गेल्या आठवड्यात कार्तिकी एकादशी तसेच त्रिपुरी पौर्णिमा आहे. त्यामुळे मासळीला फारशी मागणी नव्हती. मात्र आता उपवास नसल्याने हलवा, पापलेट, रावस या मासळीला मागणी वाढली. त्यामुळे आणि  किनारपट्टीवर वादळी वारे वाहत आहे. त्यामुळे खोल समुद्रातून होणारी मासळीची आवक कमी झाली. परिणामी, दरात १० ते २० टक्क्यांनी  वाढ झाली. तर सुरमई, बांगडा यांचे दर स्थिर असल्याची माहिती घाऊक व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मटण आणि चिकनचे दर स्थिर असल्याचे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे तसेच चिकन विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले. गावरान, इंग्लिश अंड्यांचे दर स्थिर होते. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) 

पापलेट : कापरी : १२००-१४००  मोठे-१२०० मध्यम : ९००-१०००, लहान ६००-७००, भिला : ५००-५५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ३८०-५५०, रावस : लहान ४८०-५५०,  मोठा : ७००-७५०, घोळ : ५५०-६००, करली : २००-२४०, पाला : ४००-१२००, वाम : ६००-७०० करंदी-१२०-१४०, ओले बोंबील : १००-१६०, भिंग-३६०.

कोळंबी  लहान २८०-३६०,  मोठी-४४०-५५०, जंबो प्रॉन्स : १०००-१२००  किंग प्रॉन्स : ७५०- ८००,  लॉबस्टर : १५००-१६००, मोरी : २००-२८०, खेकडे  : ३००-४०० चिंबोऱ्या : ४००-४८०, मांदेली-१००-१६०, राणीमासा-१६०-२००

खाडीची मासळी 

सौंदाळे-२००-२४०, खापी-२००-२४०, नगली : २००-२४०, तांबोशी : ३२०-३६०, पालू- २४०, बांगडा : लहान-१६०, बांगडा मोठा- २००-२४० शेवटे २००, तिसऱ्या: २४० , खुबे : १२०, लेपा-१६०-२००, पेडवी-१००, वेळुंजी-१२०-१६०, तारली-२००

नदीतील मासळी  : रहू-१२०-१६०, कतला-१३०-१६०, मरळ-४००-४४०, शिवडा-१६०-२००, खवली-१६०-२००, आम्ळी-१००-१४०, खेकडे-२००-२४०, वाम-४००-४८०

मटण- बोकडाचे ६८०   , बोलाईचे- ६८० , खिमा-६८० , कलेजी-७२० चिकन    २०० , लेगपीस-२५० , जिवंत कोंबडी-१५० , बोनलेस-३०० अंडी - गावरान शेकडा ८९०,   डझन १२०, प्रतिनगास १० इंग्लिश शेकडा ४९५, डझन ७२,  प्रतिनगास ६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com