Agriculture news in Marathi Prices of most vegetables in Pune are stable | Page 2 ||| Agrowon

पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २०) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ७० ट्रकची आवक झाली होती. भाजीपाल्याची मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २०) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ७० ट्रकची आवक झाली होती. भाजीपाल्याची मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. तर शेवगा, घेवडा आणि पावटा यांच्या दरात वाढ झाली होती.

आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून ३ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ ट्रक, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी २ टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती आवक झाली होती. तर भेंडी, गवार आणि कोबी प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, फ्लॉवर, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, भुईमूग शेंगा १५० गोणी, तर कांदा २५ ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ३० ट्रक आवक झाली 
होती. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या दीड लाख, तर मेथीच्या ५० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - ३००-१२००, मेथी -१०००-२०००, शेपू ६००-१०००, कांदापात १५००-२०००, चाकवत -५००-६००, करडई ५००-७००, पुदिना ३००-५००, अंबाडी - ५००-६००, मुळे - १०००-१५००, राजगिरा - ३००-४००, चुका ५००-८००, चवळई - ५००-७००, पालक ७००-१०००. 

फळ बाजार 
फळ बाजारात रविवारी (ता. २०) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, डाळिंबाची ३० टन, मोसंबी १० टन, संत्रा १ टन, पपई ७ टेम्पो, चिकू ३०० गोणी, पेरू २५० क्रेट, कलिंगड ५ टेम्पो, खरबूज २ टेम्पो, सीताफळ ६ टन आवक झाली होती. लिंबे (गोण) - ५०-२००, डाळिंब (प्रति किलो)  गणेश - १०-३०, आरक्ता -१०-४०, भगवा -३०-१००, मोसंबी (३ डझन) १५०-६०० (४ डझन) ६०-१६०, मोसंबी (१० किलो) ३००-१०००, पपई ७-१२, कलिंगड -५-६, खरबूज -१०-२०, सीताफळ - २०-१५०, पेरू (२० किलो) - २००-३००, 

फुलबाजार 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ३०-५०, ॲस्टर : (५ जुड्या) १५-२५, सुटा १००-१२०, कापरी : २०-३०, शेवंती : ३०-७०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-४०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००,  जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ६०- १००, शेवंती काडी ६०-१२०, लिलीयम (१० काड्या) ६००-८००, ऑर्चिड ६०-१५०, ग्लॅडिओ (१० काड्या) : 
३०-७०.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : १५०-२१०, बटाटा : ९०-१५०, लसूण : ४००-११००, आले : सातारी १५०-२००, भेंडी : २५०-३००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : १५०-२००, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १००-१२०, वांगी : ३५०-४५०, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १००-१२०, शेवगा : ५००-६००, गाजर : १५०- २०० वालवर : ४००-४५०, बीट : १००-१५०, घेवडा : ७००-९००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : ३००-४००, पावटा : ६००-८००, भुईमूग शेंग : २५०-३००, मटार - ६००-८००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, तोतापुरी कैरी - २००-२५०, गावरान - १५०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 
 


इतर ताज्या घडामोडी
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...