agriculture news in marathi, prices of petrol and diesel touched an all time high | Agrowon

पेट्रोलचा सर्वकालीन उच्चांक; सलग सातव्या दिवशी वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

नवी दिल्ली : रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. सलग सातव्या दिवशी इंधन दरवाढ झाल्याने रविवारी पेट्रोल आणि डिझेलने सर्वकालीन उच्चांक नोंदावला आहे. मुंबईत पेट्रोलने 84 रुपयांचा टप्पा ओलांडला असून, हा दर देशातील सर्वांत महागडा ठरला आहे. दिल्लीत पेट्रोल 76.24 रुपयांवर पोचले आहे. कर्नाटकातील निवडणुकानंतर आठवडाभर दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाने 80 डॉलरची पातळी ओलांडली आहे.

नवी दिल्ली : रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. सलग सातव्या दिवशी इंधन दरवाढ झाल्याने रविवारी पेट्रोल आणि डिझेलने सर्वकालीन उच्चांक नोंदावला आहे. मुंबईत पेट्रोलने 84 रुपयांचा टप्पा ओलांडला असून, हा दर देशातील सर्वांत महागडा ठरला आहे. दिल्लीत पेट्रोल 76.24 रुपयांवर पोचले आहे. कर्नाटकातील निवडणुकानंतर आठवडाभर दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाने 80 डॉलरची पातळी ओलांडली आहे. त्यातच रुपया कमकुवत झाल्याने तेल आयात खर्चिक बनली आहे. 
 

आठवडाभरात पेट्रोल 1 रुपया 61 पैशांनी महागले. डिझेलमध्ये 1 रुपया 64 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. रविवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव 33 पैशांनी वधारला आणि 76.24 रुपयांवर पोचला. डिझेलमध्ये 26 पैशांची वाढ झाली असून डिझेलसाठी ग्राहकांना 67.57 रुपये मोजावे लागत आहे. आजच्या भाववाढीने पेट्रोलने उच्चांक गाठला आहे. यापूर्वी दिल्लीत 14 सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोलचा दर 76.06 रुपयांवर गेला होता. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये इंधनावर स्थानिक कर लावल्यामुळे येथे इंधनाचे भाव इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. 

मुंबईतील दर 
पेट्रोल : 84.07 
डिझेल : 71.94 

इंधन भडकण्याची कारणे 
खनिज तेलाने प्रती पिंपामागे 80 डॉलरची पातळी ओलांडली 
चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन, डॉलरसमोर रुपया 67.27 
इंधन दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी सुसंगत केल्याने फटका 
गेल्या तीन वर्षांतील उत्पादन शुल्क वाढीने इंधन महागले 

गोव्यात सर्वांत स्वस्त पेट्रोल 
इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील इंधन सर्वांत स्वस्त आहे. पणजीमध्ये पेट्रोलचा भाव 70.26 रुपये आहे, तर डिझेल 68.77 रुपये आहे. मेट्रो शहरांचा विचार करता दिल्लीत पेट्रोलचा भाव 76.24 रुपये, भोपाळ 81.83 रुपये, पाटणा 81.73 रुपये, हैदराबाद 80.76 रुपये आणि श्रीनगरमध्ये 80.35 रुपये आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...