दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
बातम्या
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल
शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर त्यावर झालेल्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना देणाऱ्या मलकापूर येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर त्यावर झालेल्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना देणाऱ्या मलकापूर येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासंदर्भात ‘सकाळ-अॅग्रोवन’मध्ये कंपनीचे हे वृत्त पहिल्या पानावर झळकले होते. याची दखल घेण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्याच्या पर्वावर ‘मन की बात’मधून देशवासीयांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी देशातील विविध लोकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्याचे कौतुक केले. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीचे त्यांनी कौतुक केल्याने या कंपनीच्या कार्याला देशपातळीवर उजाळा मिळाला आहे.
पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले, की मित्रांनो, शेती क्षेत्रात, नव्या शक्यता निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातील एका घटनेकडे माझे लक्ष वेधले गेले. तेथे एका शेतकरी उत्पादक कंपनीने मका शेतकऱ्यांकडून मका खरेदी केला होता. कंपनीने शेतकऱ्यांना मालाच्या किमतीशिवाय, वेगळा बोनसदेखील दिला. जेव्हा कंपनीला याबाबत विचारले, तेव्हा कंपनीने सांगितले, की भारत सरकारच्या नव्या शेती नियमानुसार, शेतकरी भारतात कुठेही आपले उत्पादन विकू शकतो आणि त्याची त्यांना चांगली किंमत मिळते आहे. म्हणून त्यांनी असा विचार केला, की हा जास्तीचा मिळालेला नफा, शेतकऱ्यांसोबत वाटून घ्यायला हवा. त्या नफ्यावर शेतकऱ्यांचा देखील हक्क आहे आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना बोनस दिला आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी कंपनीच्या कामाचे कौतुक केले.
प्रतिक्रिया
‘अॅग्रोवन’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राने हीच बातमी दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल पीएमओ कार्यालयाने घेतली व नंतर सरकारी सूत्रांनी पुन्हा कंपनीच्या कार्याची खातरजमा केली. त्यानंतर पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला.
-अमित नाफडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनी, मलकापूर, जि. बुलडाणा