agriculture news in Marathi prime minister appreciated work of jay sardar farmers company Maharashtra | Agrowon

पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर त्यावर झालेल्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना देणाऱ्या मलकापूर येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर त्यावर झालेल्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना देणाऱ्या मलकापूर येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासंदर्भात ‘सकाळ-अॅग्रोवन’मध्ये कंपनीचे हे वृत्त पहिल्या पानावर झळकले होते. याची दखल घेण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्याच्या पर्वावर ‘मन की बात’मधून देशवासीयांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी देशातील विविध लोकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्याचे कौतुक केले. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीचे त्यांनी कौतुक केल्याने या कंपनीच्या कार्याला देशपातळीवर उजाळा मिळाला आहे. 

पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले, की मित्रांनो, शेती क्षेत्रात, नव्या शक्यता निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातील एका घटनेकडे माझे लक्ष वेधले गेले. तेथे एका शेतकरी उत्पादक कंपनीने मका शेतकऱ्यांकडून मका खरेदी केला होता. कंपनीने शेतकऱ्यांना मालाच्या किमतीशिवाय, वेगळा बोनसदेखील दिला. जेव्हा कंपनीला याबाबत विचारले, तेव्हा कंपनीने सांगितले, की भारत सरकारच्या नव्या शेती नियमानुसार, शेतकरी भारतात कुठेही आपले उत्पादन विकू शकतो आणि त्याची त्यांना चांगली किंमत मिळते आहे. म्हणून त्यांनी असा विचार केला, की हा जास्तीचा मिळालेला नफा, शेतकऱ्यांसोबत वाटून घ्यायला हवा. त्या नफ्यावर शेतकऱ्यांचा देखील हक्क आहे आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना बोनस दिला आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी कंपनीच्या कामाचे कौतुक केले. 

प्रतिक्रिया
‘अॅग्रोवन’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राने हीच बातमी दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल पीएमओ कार्यालयाने घेतली व नंतर सरकारी सूत्रांनी पुन्हा कंपनीच्या कार्याची खातरजमा केली. त्यानंतर पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. 
-अमित नाफडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनी, मलकापूर, जि. बुलडाणा  

 
 


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...