Agriculture news in Marathi, The Prime Minister ignores the burning questions | Page 2 ||| Agrowon

नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत शेतीप्रश्‍नांविषयी भ्रमनिरास : शेतकऱ्यांची नाराजी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता गुरुवारी (ता. १९) नाशिक येथे झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून सभेला संबोधित केले. मात्र, सध्याच्या ज्वलंत शेतीप्रश्नांवर न बोलता मुख्य प्रश्न दुर्लक्षित केल्याने सभास्थानी उपस्थित शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. थेट मुद्द्यांवर चर्चा न झाल्याने सभेनंतर दबक्या आवाजात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. 

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता गुरुवारी (ता. १९) नाशिक येथे झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून सभेला संबोधित केले. मात्र, सध्याच्या ज्वलंत शेतीप्रश्नांवर न बोलता मुख्य प्रश्न दुर्लक्षित केल्याने सभास्थानी उपस्थित शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. थेट मुद्द्यांवर चर्चा न झाल्याने सभेनंतर दबक्या आवाजात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. 

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, ऊस, मका ही प्रमुख पिके आहेत. मात्र, चालू वर्षी अनेक अडचणी शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या वेदना सोबत घेऊन अनेक जण सभास्थळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कांद्याच्या भावाबाबत सरकारने अनेक निर्णय घेऊन दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात लष्करी अळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर या सभेत उहापोह होईल, अशी खात्री घेऊन शेतकरी सभेला उपस्थित होते. मात्र, ज्वलंत शेतीप्रश्नावर कोणीच स्पष्ट न बोलल्याने मोठा भ्रमनिरास झाल्याचे उपस्थितांच्या चर्चेमधून दिसून आले. 

देवळा तालुक्यातील एका ज्येष्ठ शेतकऱ्याने सांगितले, मी सरकारला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होतो. मात्र, आमच्या प्रश्नांवर सरकार स्पष्टपणे बोलले नाही. बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने सांगितले, चालू वर्षी लष्करी अळीने मोठे नुकसान केल्याने आर्थिक कोंडीत सापडलो आहे. तर बियाणे व औषधांच्या कंपन्यांनी आमची लूट केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा सरकारवर रोष असल्याचे या निमित्ताने सभेनंतर दिसून आले.

शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्‍न

  • कांद्याचे दर पाडू नयेत, नाहीतर आम्हाला हमीभाव द्यावा
  • शेतकरी कर्जमाफीची घोषणा अमलात आणावी
  • लष्करी अळीला आळा घालण्यासाठी पाऊल उचलावे
  • सावकारी कर्जामुळे पिळवणूक होते, शेतीकर्ज रास्त दराने उपलब्ध करून द्यावे 
  • खतांच्या किमती कमी कराव्यात.

इतर ताज्या घडामोडी
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...