महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान मोदी येणार

महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान मोदी येणार
महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान मोदी येणार

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात महाजनादेश यात्रा काढली आहे. भाजपच्या शेवटच्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप १९ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. समारोप यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

समारोप तपोवन येथील चव्हाण मळ्यात होणार असल्याचे निश्चित झाले असून पालकमंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महापालिका अधिकारी यांच्यासमवेत जागेची पाहणी केली.

महाजनादेश यात्रेच्या शेवटच्या टप्प्याचा समारोप कार्यक्रम नाशिक येथे होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार असून जाहीर सभा होणार आहे. यासाठी सभेला असणारी उपस्थिती व पुढील नियोजन या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आलाय असून तयारी सुरू झाली आहे. सभेला तीन लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली आहे. मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेसाठी व्यासपीठ उभारणी, वाहनतळ, साउंड व्यवस्था, सभेसाठी प्रवेश याबाबत पालकमंत्र्यांनी उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

यावेळी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, शहर अभियंता संजय घुगे, प्रभारी विभागीय अधिकारी आर. एस. पाटील, सी. बी. अहेर, उद्यान विभागाचे वसंत ढुमसे, आडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर मोरे, नगरसेवक उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com