agriculture news in marathi, prime minister narendra modi appeal to sarpanch for water conservation, pune, maharashtra | Agrowon

पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः पंतप्रधानांचे सरपंचांना पत्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी जास्तीत जास्त संकलन करीत, पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा. अशक्यप्राय गोष्टींना शक्य करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सरपंचांना केले आहे. यासाठी मोदी यांनी सर्व सरपंचांना पत्र पाठवले असून, पावसाचे पाणी जिरवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या सूचना केल्या आहेत. तर, यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्याचीदेखील सूचना केली आहे.  

पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी जास्तीत जास्त संकलन करीत, पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा. अशक्यप्राय गोष्टींना शक्य करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सरपंचांना केले आहे. यासाठी मोदी यांनी सर्व सरपंचांना पत्र पाठवले असून, पावसाचे पाणी जिरवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या सूचना केल्या आहेत. तर, यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्याचीदेखील सूचना केली आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सरपंचांना पत्र पाठवले आहे. या पत्रात मोदी यांनी म्हटले आहे, की वर्षा ऋतूचे आगमन होत आहे. आपण भाग्यवान आहोत, की देवाने आपल्याला पावसाची देणगी दिली आहे. याचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. यासाठी पाऊस सुरू झाल्यावर पावसाचे पाणी जास्तीत जास्त संकलन करण्याच्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. यासाठी शेताची बांध बंदिस्ती, नदी -नाल्यांमध्ये बंधारे, तलावांचे खोलीकरण, सफाई, वृक्षारोपण करीत शेतामधील पाणी शेतामध्ये आणि गावातील पाणी गावांमध्येच साठले पाहिजे. आपण जर या उपाययोजना केल्या, तर फक्त शेतीमधील उत्पादन वाढणार नाही, तर पाण्याचे मोठे संकलन होऊन गावाच्या विविध कामांना त्याचा उपयोग होईल. 

माझी आग्रही विनंती आहे, की आपण ग्रामसभा बोलावून माझ्या पत्राचे सामूहिक वाचन करून, मी सांगितलेल्या जलसंधारणाच्या विविध सूचनांचा विचारविनिमय करावा. मला विश्‍वास आहे, की ग्रामीण पातळीवर आपण सर्व मिळून पावसाचा प्रत्येक थेंब साठवून उपकृत करावे. ज्याप्रमाणे आपण स्वच्छता अभियानात व्यापक सहभाग घेत चळवळ करत हे अभियान यशस्वी केले. याचप्रमाणे माझा आग्रह आहे, की पाणी या आपल्या आगामी अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देत याला यशस्वी करण्यासाठी आपण याचे नेतृत्व करत, अशक्यप्राय गोष्टींना शक्य करावे.

दरम्यान, २० जून रोजी ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आल्या आहेत. 
दरम्यान, गुजरातमधील सरपंचांना गुजराथी भाषेतून पत्र पाठविण्यात आले असून, महाराष्ट्रातील सरपंचांना मात्र हिंदी भाषेतून पत्र पाठविण्यात आल्याने सरपंचांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...