agriculture news in marathi, prime minister narendra modi give assurance to create food processing unit in varhad, akola, maharashtra | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडात टेक्स्टटाइल, अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यास प्राधान्य ः पंतप्रधान नरेंद्र मोदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

अकोला  ः विदर्भातील वऱ्हाड हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळापासून उद्योगधंद्यांसाठी अग्रेसर राहिलेला आहे. आगामी काळात येथे टेक्स्टटाईल, अन्न प्रक्रियेवर आधारीत उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अकोला  ः विदर्भातील वऱ्हाड हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळापासून उद्योगधंद्यांसाठी अग्रेसर राहिलेला आहे. आगामी काळात येथे टेक्स्टटाईल, अन्न प्रक्रियेवर आधारीत उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर बुधवारी (ता.१६) आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत श्री. मोदी बोलत होते. या वेळी श्री. मोदी म्हणाले, की देश आणि राज्यात भाजप महायुतीचे सरकार आल्यापासून विविध योजना राबविल्या जात आहेत. आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत. यामुळे भ्रष्टाचार रोखता आला आहे. राज्यात फडणवीस सरकारने सिंचन प्रकल्प, वीजनिर्मितीसाठी मोठे काम केले. जलयुक्त शिवारसारखे अभियान राबविले गेले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून आतापर्यंत सुमारे दोन हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

१५ वर्षांपूर्वी या भागातील बॅरेजचे भूमिपूजन तेव्हाच्या सरकारने केले होते. तेव्हापासून हे काम रखडले. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने बॅरेजेसचे काम पूर्णत्वास नेले. यामुळे सिंचनाला मोठा फायदा होईल. केंद्र सरकार येत्या पाच वर्षांत प्रत्येक घरात शुद्ध पाणी देण्यासाठी काम करणार असल्याचा त्यांनी पुनर्च्चार केला.

अकोला विभाग हा सुरवातीपासून उद्योगधंद्यात अग्रेसर आहे. दळणवळण क्षेत्रात आगामी काळात सुविधा वाढल्यानंतर उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा तयार होईल. मागील पाच वर्षांत केंद्राने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या काळात विदर्भाच्या नावाने पॅकेज जाहीर व्हायचे. मात्र पॅकेजचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोचत नव्हता. राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘भ्रष्टवादी युती’ला २०१४ मध्ये नाकारले. या वेळीही जनता अधिक मतांनी त्यांना दूर करेल असा विश्वास असल्याचे श्री. मोदी म्हणाले.

या निवडणुकीत प्रचारात ३७० कलमाविषयी बोलत असल्याने विरोधकांना पोटशूळ झाल्याचे सांगत त्यांनी जम्मू काश्मीर आणि तेथील जनता ही याच देशातील आहे. त्यामुळे हा काही बाहेरचा मुद्दा नाही, असा खुलासा श्री. मोदी यांनी या वेळी केला.


इतर बातम्या
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
भांबेडला एक हेक्टर भातशेतीचे नुकसानरत्नागिरी ः जिल्ह्यात गेले दोन जोरदार पडत आहे....
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...