agriculture news in marathi, prime minister narendra modi speak in election campaign, mumbai, maharashtra | Page 2 ||| Agrowon

महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः पंतप्रधान नरेंद्र मोदी
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना-भाजप महायुतीने शुक्रवारी (ता. १८) मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जाहीर सभा घेतली. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर उपस्थित होते.  

मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना-भाजप महायुतीने शुक्रवारी (ता. १८) मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जाहीर सभा घेतली. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर उपस्थित होते.  

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, की गेल्या ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे. भाजप सरकारने गेल्या ५ वर्षांत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना सर्व सेवा ऑनलाइन केल्या. गरिबांना घरे, वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन दिले. ३७० आणि ३५ ए ही कलमे हटवली. काँग्रेसची भाषा ही नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन देणारी होती. या लोकांना महाराष्ट्राशी काही घेणे देणे नसून, आत्तापर्यंत केवळ एकाच कुटुंबाने देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात योगदान दिल्याचे सांगत राजकारण केले. मात्र, आता हे चालणार नाही.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी यंदा एकाच महिन्यात दोनदा दसरा, विजयाचा दसरा आणि दिवाळीही साजरी होणार असल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मोदींच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र तयार होतो आहे. पुढच्या पाच वर्षांत १ कोटी रोजगार द्यायचा आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे आमचे स्वप्न आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले आहे.

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...