मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी कुटुंबांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत १६ लाखांवर शेतकरी कुटुंबाची माहिती पीएम किसान पोर्टलवर व्हलीडेशन टूलच्या माध्यमातून अपलोड करण्यात आली आहे. ८ लाख ९४ हजार ३४३ शेतकरी कुटुंबांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून, मराठवाड्यात सुमारे ९४.५८ टक्‍के काम पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे निकष शासनाने शिथिल केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. मराठवाड्यात एकूण खातेदारांपैकी २४ लाख ५२ हजार ३३६ लाभार्थी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरण्याची अपेक्षा होती. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ९३५, जालन्यातील २ लाख ९० हजार ९३२, परभणीतील २ लाख ६८ हजार ७७८, हिंगोलीतील २ लाख ९ हजार ४२८, नांदेडमधील ३ लाख ९१ हजार ७३८, बीडमधील ४ लाख १ हजार ५५९, लातूरमधील ३ लाख ३३ हजार २५९ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार ७०७ शेतकरी लाभार्थ्यांचा समावेश अपेक्षित होता.

योजनेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर १७ जूनअखेरपर्यंत मराठवाड्यातील १५ लाख ६ हजार ७४५ लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ६४८, जालना जिल्ह्यातील १ लाख ५० हजार ७६८, परभणी जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार २, हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार २३५, नांदेड जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ९२५, बीड जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ९९०, लातूर जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ५१७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ६६० लाभार्थ्यांचा समावेश होता.

उर्वरित ९ लाख ४५ हजार ५९१ लाभार्थ्यांपैकी पुन्हा ९ लाख ३ हजार २९५ शेतकरी कुटुंबांची योजनेसाठी अनिवार्य असलेली माहिती परिपूर्ण असल्याचे समोर आले आहे. यापैकी १९ जुलै अखेरपर्यंत १ लाख ८ हजार ६९६ लाभार्थ्यांची माहिती पी. एम. किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. शिवाय यापैकी उर्वरित ८ लाख ९४ हजार ३४३ लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com