agriculture news in Marathi prime minister should serious in this situation Maharashtra | Agrowon

संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवे : बाळासाहेब थोरात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देश एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देश एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. दिवे लावा, टाळ्या वाजवा, असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नसून त्यांनी आतातरी गंभीर व्हायला हवे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले, कि कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस यंत्रणेसह सर्वजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे.

जास्तीत जास्त प्रमाणात व्हेंटीलेटर उपलब्ध करणे, टेस्टींग लॅबची संख्या वाढवणे, डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना आवश्यक असलेले कीट उपलब्ध करुन देणे तसेच राज्य सरकारना जास्तीत जास्त मदत करणे, नागरिकांना धीर देणे, त्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीबरोबर सर्वप्रकारचे साहाय्य देण्यास प्राधान्य देणे हे त्यांचे काम आहे, दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाला एका कणखर व जबाबदार नेतृत्वाची गरज असते दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे ते नाही. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा एक रोगच त्यांना लागला आहे. याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीवेळीही इव्हेंट करुन परिस्थितीचे गांभीर्य घालवले जात आहे, असेही थोरात म्हणाले. 
 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...