दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवाः राज ठाकरे 

दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले असते, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत.
Raj thackrey
Raj thackrey

मुंबई: दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले असते, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत, याचा माहिती दिली असती तर बरे झाले असते, असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.  राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.४) राज्यातील जनतेशी संवाद साधला. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना रविवारी सर्वांना दिवे लावायला सांगितले. नाहीतरी आपण घरात बसून काय करणार असे म्हणत लोकं त्यांचे ऐकतीलही. हे सर्व सांगण्याऐवजी त्यांनी आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत. उद्या काय घडणार याबाबत माहिती दिली असती तर लोकांना बरे वाटले असते. सध्या देशात जी संभ्रमावस्था आहे ती पदावर बसलेल्या लोकांनी दूर केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते. आज ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना काही समजत नाही,’’ असे राज ठाकरे म्हणाले. 

लॉकडाऊनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. इतकी शांतता आपण ९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती. असा प्रसंग आजपर्यंत कोणाच्या आयुष्यात आला नव्हता. असे कधी बघितलं नव्हते. एखाद्या देशात एखादी घटना घडते हे आपण पाहिले आहे. पण जगभर एकच गोष्ट घडतीये असे कोणी पाहिलेले नाही. मी इतकी शांतता मुंबईच्या दंगलीतही पाहिली नव्हती, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. 

लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉकडाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती,” असे ही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com