agriculture news in Marathi prime minister should show ray off hopes Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवाः राज ठाकरे 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले असते, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत.

मुंबई: दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले असते, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत, याचा माहिती दिली असती तर बरे झाले असते, असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 

राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.४) राज्यातील जनतेशी संवाद साधला. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना रविवारी सर्वांना दिवे लावायला सांगितले. नाहीतरी आपण घरात बसून काय करणार असे म्हणत लोकं त्यांचे ऐकतीलही. हे सर्व सांगण्याऐवजी त्यांनी आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत. उद्या काय घडणार याबाबत माहिती दिली असती तर लोकांना बरे वाटले असते. सध्या देशात जी संभ्रमावस्था आहे ती पदावर बसलेल्या लोकांनी दूर केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते. आज ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना काही समजत नाही,’’ असे राज ठाकरे म्हणाले. 

लॉकडाऊनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. इतकी शांतता आपण ९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती. असा प्रसंग आजपर्यंत कोणाच्या आयुष्यात आला नव्हता. असे कधी बघितलं नव्हते. एखाद्या देशात एखादी घटना घडते हे आपण पाहिले आहे. पण जगभर एकच गोष्ट घडतीये असे कोणी पाहिलेले नाही. मी इतकी शांतता मुंबईच्या दंगलीतही पाहिली नव्हती, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. 

लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉकडाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती,” असे ही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
अकोला जिल्हा परिषदेला जमीन...अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची...
सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या...नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या...
सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस...सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक...
मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी,...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
बीबीएफ टोकण यंत्राने करा पेरणीरुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...