Agriculture news in marathi; Prime Minister's Farmers' Honor Scheme Farmers' response to enrollment | Agrowon

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या नावनोंदणीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २५ ऑगस्टपर्यंत गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिबिरामध्ये व सामाईक सुविधा केंद्रांवर नाव नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. 

वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २५ ऑगस्टपर्यंत गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिबिरामध्ये व सामाईक सुविधा केंद्रांवर नाव नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. 

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी या योजनेच्या नाव नोंदणीसाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश तालुकास्तरीय यंत्रणांना दिले होते. तसेच, या शिबिराला संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. या शिबिरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान, नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गाव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे.


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...