agriculture news in Marathi princess of Spain died of corona Maharashtra | Agrowon

स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू; राजघराण्यातील पहिला बळी

वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा रविवारी (ता.२९) कोरोनामुळे मृत्यू झाला.

माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा रविवारी (ता.२९) कोरोनामुळे मृत्यू झाला. स्पेनमध्ये सध्या कोरोनाने उद्रेक मांडला असून, आठ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यात राजघराण्यातील पहिल्याच व्यक्तीचा या रोगामुळे मृत्यू झाला.

स्पेनच्या राजाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र राजकन्या यातून वाचू शकली नाही. ८६ वर्षीय असलेल्या मारीया या स्पेनचे राजे फिलीफ सहावे यांच्या चुलतबहीण होत्या. याबाबत सोशल मिडीयावर त्याांचे भाऊ राजपुत्र सिक्थो अॅड्रीक्यू बार्बन यांनी सांगितले या निधनाची माहिती दिली.  मारिया या पॅरीसमध्ये मृत्यू पावल्या.

हा विषाणू श्रीमंत आणि गरिब यांच्यात फरक करत नसल्याचे यामुळे पुन्हा स्पष्ट झाले. राजकीय नेत्यांनाही या विषाणून सोडले नाही. इंग्लडचे राजे चार्ल्स, पंतप्रधान, आरोग्यमंत्री यांनाही या विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हा विषाणू चीननंतर युरोपातील इटली आणि स्पेन या देशांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

इटलीमध्ये दहा हजारांहून अधिक जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे ५६९० जणांना यामुळे जीव गमवावा लागला. अमेरिकेत एक लाख वीस हजार लोकांना याची लागण झाली आहे. तेथेही मृत्यूचे प्रमाण वाढत आता दोन हजारांवर पोहोचले आहे.

स्पेनच्या पंतप्रधानांनी सध्याची तीन आठवड्यांचा लॉकडाऊन आणखी पुढे दोन आठवड्यांनी वाढवला आहे. अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांनी पुढील दोन आठवडे घरीच राहण्यास सांगितले आहे. २८ मार्च रोजी स्पेनमध्ये ८३२ जणांचा चोवीस तासांत मृत्यू झाला.

स्पेनमधील रुग्णालये आणि दफनभूमीतील कर्मचाऱ्या सध्या फार मोठ्या ताणात काम करत आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार०५९ वरून ७२ हजार २४८ पर्यंत पोहोचली आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...