मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय : जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल मीडियावर विविध बातम्यांसह माहितीचा भडीमार सुरू असताना सर्वाधिक विश्‍वसनीय तसेच उपयोगी माहिती मुद्रित माध्यमांनीच दिली आहे.
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय : जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय : जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल मीडियावर विविध बातम्यांसह माहितीचा भडीमार सुरू असताना सर्वाधिक विश्‍वसनीय तसेच उपयोगी माहिती मुद्रित माध्यमांनीच दिली असून, वाचकांनीसुद्धा सर्वाधिक विश्‍वास वर्तमानपत्रांवरच दाखविल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. शिवाय सोशल मीडियावर येणारी पन्नास ते अंशी टक्के माहिती अविश्‍वसनीय आणि निरुपयोगी असल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईज मन्नान हक यांच्या नेतृत्वात ६८ विद्यार्थ्यांनी विविध वयोगट आणि व्यवसायाशी संबंधित असलेल्यांचे २८ मार्च ते चार एप्रिल दरम्यान ऑनलाइन सर्वेक्षण केले. आपत्तीच्या प्रसंगी नागरिक माहिती कुठून आणि कशी मिळवता, प्रसारमाध्यमांबाबत त्यांचे काय मत असे आणि अन्य प्रश्‍न महिला, पुरुष, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक व इतर नागरिकांना विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणात एकूण एक हजार २०५ नागरिक सहभागी झाले होते. यात ६५.६ टक्के पुरुष, ३८ टक्के महिलांचा समावेश होता. सर्वेक्षणाद्वारे वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र, रेडिओ, समाजमाध्यमे (सोशल मीडिया) आणि डिजिटल मीडिया या पाच माध्यमांबाबत माहिती घेण्यात आली. त्यात एक तृतीयांशापेक्षा अधिक नागरिकांनी कोरोना संक्रमणापूर्वी वर्तमानपत्र आणि प्रामुख्याने वाहिन्यांकडून माहिती घेतली असे सांगितले. मात्र, मागील एक महिन्यात माहितीसाठी वृत्तवाहिन्यांचा वापर ८ टक्‍क्‍यांहून अधिक वाढला आहे. दुसरीकडे प्रथम क्रमांकावर असलेल्या वर्तमानपत्रांचा स्रोत म्हणून होत असलेल्या वापर नंतरच्या काळात ११ टक्‍क्‍यांनी घसरला. या काळात वर्तमानपत्रांचे प्रकाशन बंद होते. या काळात डिजिटल मीडियाचा वापर ५.८ टक्‍क्‍यांनी वाढला असल्याचेही दिसून आले. इ-पेपर वाचणाऱ्यांची संख्या वाढली वर्तमानपत्रे प्रकाशित झाली नाहीत त्या काळात आवडीचे वर्तमानपत्र ऑनलाइन वाचल्याचे अनेक वाचकांनी सांगितले. वर्तमानपत्रांच्या अनुपस्थिती काय केले अशी विचारणा केली असता ३६.०१ टक्के नागरिकांनी वृत्तवाहिन्यांमधून माहिती घेतल्याचे सांगितले. तर, २२.०८ टक्के वाचकांनी इ-पेपर वाचल्याचे सांगितले. २७ टक्के नागरिकांनी सोशल मीडियावर मित्र व विविध ग्रुपवरून उपलब्ध झालेल्या इ-पेपरचा फायदा झाल्याचे सांगितले. या काळात १०.०४ टक्के वाचक निव्वळ सोशल मीडियावरच अवलंबून होते, असेही या सर्वेक्षणात आढळून आले. सोशल मीडियावरचा विश्‍वास उडाला सर्वेक्षणाच्या माध्यमातून विश्वसनीयता, उपयोगिता आणि जबाबदारी अशा तीन निकषांवर वाचकांचा कौल जाणून घेण्यात आला. यात सर्वाधिक वाचकांनी वर्तमानपत्रांवर सर्वाधिक विश्‍वास दर्शवला. खोट्या व भ्रमित करणाऱ्या बातम्या, माहिती याविषयी विचारणा केली असता ३९.०१ टक्के नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती ५० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत अविश्‍वसनीय असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील माहिती खरी की खोटी हे कसे कळले? अशी विचारणा केली असता ३६.५ टक्के नागरिकांनी सरकारने केलेले खुलासे तर ५१.५ टक्के नागरिकांनी सत्य शोधन वेबसाइट व पारंपारिक माध्यमातून पडताळणी केल्याचे सांगितले. सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती महत्त्वाची आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराच्या काळात ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवणे आवश्‍यक आहे. कुठल्याही माहितीच्या स्रोतावर जनतेला शंका असेल तर कठीण काळात कोरोनाच्या संक्रमणाला रोखणे अवघड होऊ शकते. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहितीचा उपयोग आणि माध्यमांकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. - डॉ. मोईज हक, जनसंवाद विभागाचे प्रमुख 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com