Agriculture news in marathi; Prior to getting Mahabaj seed in Varhad, farmers' queues for permits only | Agrowon

वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी परमीटसाठीच शेतकऱ्यांच्या रांगा
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम बीजोत्पादन योजना यामधून शेतकऱ्यांना चालू हंगामात महाबीजचे बियाणे अनुदानावर वितरित केले जात आहे. मात्र, हे बियाणे मिळविण्यासाठी लागणारे परमीट घेण्यासाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्यांचा संपूर्ण दिवसच यासाठी खर्ची होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने परमीटवाटपासाठी आणखी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम बीजोत्पादन योजना यामधून शेतकऱ्यांना चालू हंगामात महाबीजचे बियाणे अनुदानावर वितरित केले जात आहे. मात्र, हे बियाणे मिळविण्यासाठी लागणारे परमीट घेण्यासाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्यांचा संपूर्ण दिवसच यासाठी खर्ची होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने परमीटवाटपासाठी आणखी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

महाबीजचे अनुदानित बियाणे वाटपासाठी जिल्ह्यात मागील काही हंगामापासून परमीट लागू करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी बियाणेवाटपात झालेल्या घोळानंतर या जिल्ह्यात बियाण्यासाठी परमीट बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे आताच्या हंगामासाठी उपरोक्त योजनांचे अनुदानित बियाणे वितरण करण्यासाठी परमीट आवश्यक आहे. मात्र कृषी सहायकांनी हे परमीट वाटपास नकार दिला होता.

कृषिकेंद्र चालकांनीही परमीटशिवाय बियाणे देण्यास नकार दिला. यामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. तोंडावर आलेला हंगाम लक्षात घेता तालुका कृषी कार्यालयात परमीटवाटप केले जात आहे. हे परमीट मिळविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. परमीटवाटपासाठी एकच काउंटर असून तासनतास उभे राहावे लागत आहे. खेड्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा यामध्ये संपर्ण दिवस खर्ची होत आहे. शेतकऱ्यांचा कल प्रामुख्याने सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी आहे. योजनेनुसार या शेतकऱ्यांना जेएस ३३५ हे बियाणे अवघे एक बॅग मिळत आहे. सोयाबीनच्या या बियाण्याची प्रामुख्याने मोठी मागणी आहे. असे असताना ना वेळेवर परमीट दिले जात आहे ना हवे तितके बियाणे मिळत आहे, यामुळे अनेक शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होत आहे.

कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. महाबीज बियाणे मिळण्यासाठी हवे असलेले परमीट तासन्‌तास उभे राहूनही भेटत नाही. अनेकजण सकाळपासून रांगेत असतात. त्यांना दुपारी परमीट मिळते. वाटपाची गतीसुद्धा संथ आहे. शेतकऱ्यांना पाहिजे असलेले बियाणे पुरेसे नाही. प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या गैरसोयी तातडीने दूर कराव्यात.  
- मनोहर ठोकळ, शेतकरी, दहिगाव गावंडे, ता. अकोला
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...