Agriculture news in marathi Prioritize agriculture question in Solapur development: Guardian Minister Valase-Patil | Agrowon

सोलापूरच्या विकासात शेती प्रश्नाला प्राधान्य देऊ : पालकमंत्री वळसे-पाटील

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 जानेवारी 2020

सोलापूर जिल्हा परिषदेने घरकुल उभारणीत आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व विविध घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. विकासात प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे
- दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री, सोलापूर

सोलापूर : ‘‘हा जिल्हा शेती आणि शेतीवर आधारित उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रामुख्याने शेतीशी निगडीत प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहील. त्यादृष्टीने जलसिंचन, कृषी उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य असेल’’, अशी ग्वाही पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली.

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम रविवारी (ता.२६) पोलीस मुख्यालय येथे झाला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री वळसे-पाटील बोलत होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, ‘जिल्ह्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांसंबंधी आपण जातीने लक्ष घालू. पंढरपूर, अक्कलकोट आणि ग्रामदैवत श्री सिध्देश्वर या तीर्थक्षेत्रांचा नियोजनबध्द विकास होईल, यासाठी अधिकचा निधी मागण्यासाठी प्रयत्नशील असू. सोलापुरातील विविध व्यवसाय आणि उद्येागांना चालना मिळण्यासाठी रस्त्यांचा विकास गतीने करण्यावर भर आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग विभाग विविध रस्ते विकासाच्या योजनांमधून सोलापूर आणि महत्वाच्या शहरांशी संपर्क वाढेल, यासाठी प्रयत्न करीत आहे.’’ 

शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामूळे नागरिकांना विविध सेवा सुविधा गतीने मिळतील, अशी अपेक्षा आहे. सात-बारा संगणकीकरण, गावांची ड्रेाणद्वारे मोजणी व मालमत्ता पत्रिकांचे संगणकीकरण यांचा यामध्ये समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...