agriculture news in marathi, Priority to completing incomplete projects in the state | Agrowon

राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य : जलसंपदामंत्री

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018
  टेंभूर्णी, जि. सोलापूर : सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी येत्या दोन वर्षांत १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. मागील सरकारने जवळपास १ लाख कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. २५ ते ४० वर्षांपासून हे प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामुळे पाच वर्षांत एकही नवीन प्रकल्पाचे काम हाती न घेता सरकारने अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे.
  टेंभूर्णी, जि. सोलापूर : सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी येत्या दोन वर्षांत १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. मागील सरकारने जवळपास १ लाख कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. २५ ते ४० वर्षांपासून हे प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामुळे पाच वर्षांत एकही नवीन प्रकल्पाचे काम हाती न घेता सरकारने अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यासाठी ८० हजार कोटी रुपयांचा निधी ठेवून, येत्या दोन वर्षांत या प्रकल्पांची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
 
सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक दोन व बंद पाइपलाइन कामाचे भूमिपूजन रोपळे (ता. माढा) येथे महाजन यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार धनाजीराव साठे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, उपविभागीय अधिकारी मारुतीराव बोरकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, झुंझार भांगे आदी उपस्थित होते.
 
महाजन म्हणाले,"शेतकरी सुखी कसा होईल. त्याचे जीवनमान कसे उंचावेल, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. भीमा आणि सीना नदीला कालव्याचा दर्जा देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा. सोलापूरला पिण्यासाठी पाइपलाइनमधून पाणी नेल्यास २० टीएमसी पाण्याची बचत होईल. पाइपलाइनचे काम १० महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना आपण केली आहे.''
 
बबनराव शिंदे म्हणाले, "माढा तालुक्‍यात यावर्षी ३० टक्केही पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. उजनीतून पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत. उर्वरित पाच हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी १०० कोटी रुपये दोन वर्षांत द्यावेत. भीमा व सीना नदीवर बॅरेजेस बंधारे बांधावेत.'''' अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप शेरेकर यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढतेय...पठारी प्रदेशात वातावरणातील धुलिकणांची पातळी...
राज्याबरोबर केंद्राच्या मदतीची गरजः शरद...उमरगा, जि. उस्मानाबाद: नैसर्गिक आपत्तीच्या...
साताऱ्यात पावसाने बटाटा पीक गेले वाहूनविसापूर, जि. सातारा ः पुसेगावसह (ता. खटाव)...
परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर...परभणी ः यंदाच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर...
दोन लाख रुपयांवरील थकबाकीदारांना...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः दोन लाख रुपयांपेक्षा...
पुणे जिल्ह्यात अठरा हजार हेक्टरवर...पुणे ः गेल्या तीन दिवसांपासून पावसाने काहीशी...
मदतीची घोषणा, की आश्वासनांनी बोळवण?...सोलापूर ः जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने...
नगरमध्ये रब्बी ज्वारीचे तीन हजार...नगर ः रब्बी ज्वारीचे सुधारित बियाणे पेरणी होऊन...
धानाला १००० रुपये बोनस द्या;...भंडारा : निविष्ठांच्या दरात झालेली वाढ, कीड...
राजारामबापू कारखाना उसाचे २५ लाख टन...इस्लामपूर, जि. सांगली : राज्याचे जलसंपदामंत्री,...
ऊस तोडणी हंगामात पावसाचा अडथळाकोल्हापूर : शासनाने गुरुवार (ता. १५) पासून ऊस...
नाशिक जिल्ह्यात हमीभावाने होणार बाजरी...येवला, जि. नाशिक : शासकीय भरड धान्य खरेदी...
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे ः डॉ....आळसंद, जि. सांगली :  शेतकऱ्यांनी आता...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
कृषी सल्ला (भात, आंबा, काजू, नारळ,...नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या...
बटाटा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा...
आरोग्यदायी चंदनलेप लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून वापरले जाते....
अकोला जिल्ह्यात सोयाबीनच्या सोंगणी,...अकोला ः परतीच्या पावसाने सोयाबीन हंगामाची...
यवतमाळ जिल्ह्यातील पांदण रस्ते पूर्ण...यवतमाळ  : ‘‘‘पालकमंत्री पांदणरस्ते’...
नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टर पिकांचे...नांदेड : ऑक्टोबर महिन्यात सलग आठ दिवस...