कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी

कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ साठी ३२२ कोटींचा आराखडा राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्यात आला होता.
400 crore fund for Kolhapur
400 crore fund for Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ साठी ३२२ कोटींचा आराखडा राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्यात आला होता. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या वित्तीय मर्यादेत ७८ कोटींची अतिरिक्त भर पडून सन २०२२-२३ साठी ४०० कोटींच्या निधीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी दिली आहे.  कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ च्या आराखड्याला मान्यता देण्यासाठी राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने झाली. या बैठकीला मुंबईतून पालक सचिव राजगोपाल देवरा तसेच वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्यातून विभागीय आयुक्त सौरभ राव सहभागी झाले. कोल्हापूरमधून पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.  कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता अधिक आहे. मानव विकास निर्देशांकात राज्यात कोल्हापूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर, तर दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर आहे. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून रस्ता दुरुस्ती, जॅकवेलसह बऱ्याच बाबींवर जिल्हा वार्षिक योजनेतून निधी खर्च होतो. तर महिला व बाल विकासासाठी ३ टक्के राखीव निधी ठेवावा लागतो. राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या बऱ्याच योजनांचे जिल्हास्तरावरील सर्वसाधारण योजनेत हस्तांतर झाले आहे. या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत वाढ झाली नाही. आदी सर्व बाबींचा विचार होऊन कोल्हापूर जिल्ह्याला निधी वाढवून मिळावा, अशी पालकमंत्री पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. 

विविध कामे प्रस्तावित  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. सन २०२२-२३ च्या आराखड्यात क्लिनिकल स्कील लॅब, सुसज्ज व आधुनिक ग्रंथालय, मत्स्यालय बांधकाम, वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र, सौर कुंपण, जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास आदी कामे प्रस्तावित आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, पर्यटन विकास आणि लोकसंख्या लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची विनंती पालकमंत्री पाटील यांनी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com