भारताला असलेले प्राधान्य काढण्याचा विचार : डोनाल्ड ट्रम्प

भारताला असलेले प्राधान्य काढण्याचा विचार
भारताला असलेले प्राधान्य काढण्याचा विचार

वॉशिंग्टन : भारतीय बाजारपेठ पुरेशा प्रमाणा उपलब्ध करून देण्यात भारताला अपयश आल्याने व्यापारात या देशाला असलेले प्राधान्य काढून घेण्याचा विचार करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (ता.५) सांगितले. भारताला एकेकाळी 'करांचा राजा' असे संबोधणाऱ्या ट्रम्प यांच्या या निर्णयाचा द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. ट्रम्प यांनी भारताबरोबरच तुर्कस्तानला असलेले प्राधान्यही काढण्याबाबत विचार सुरू केला आहे. चीनसारख्या काही देशांबरोबर असलेले 'असमतोल' व्यापारसंबंधांचा फेरआढावा घेण्याचे धोरण ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा दामटले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची व्यापारतूट कमी करण्याचा निश्‍चय केला असून, त्यांनी भारतालाही कर कमी करण्याबाबत वारंवार सांगितले आहे. आज त्यांनी अमेरिकी संसदेला पत्र लिहीत भारत आणि तुर्कस्तानला दिलेले व्यापार फायदे बंद करण्याचा विचार असल्याचे सांगितले. अमेरिकेने जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी) धोरणांतर्गत भारत आणि तुर्कस्तानातून आयात होणाऱ्या काही वस्तूंना करमुक्त दर्जा दिला आहे. २०१७ मध्ये या धोरणाचा भारताला सर्वाधिक फायदा होऊन ५.७ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली होती, तर तुर्कस्तानही पाचवा सर्वांत मोठा फायदा मिळविणारा देश ठरला होता. आज ट्रम्प यांनी भारताबद्दल नाराजी व्यक्त करत या देशाने अमेरिकेला बाजारपेठ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे ठोस आश्‍वासन अद्याप दिलेले नाही, असे अमेरिकी प्रतिनिधिगृहाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. भारताने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांना असलेले प्राधान्य कायम ठेवण्यास हरकत नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या मालावर प्रचंड कर लावत असल्याबाबत ट्रम्प यांनी वारंवार भारताबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वीही ट्रम्प यांनी भारतातील उच्च करांबाबत टीका करत त्याच प्रमाणात भारतीय मालावरही कर लावण्याची धमकी दिली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com