Agriculture news in marathi Priority should be given to pre-monsoon works: Collector steps | Agrowon

मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः जिल्हाधिकारी कदम 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी महत्त्वाची आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. 

भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी महत्त्वाची आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी म्हणाले, की मॉन्सूनपूर्व कालावधीत सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात १५४ नदीकाठावरील गावे आहेत. त्यापैकी १३० गावे पूर परिस्थितीने बाधित होतात व पूराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील एकूण १८ गावांचा संपर्क तुटतो या गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थतीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जागा शोधून ठेवाव्यात. उंच जागा, पर्यायी मार्ग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था व औषधसाठा उपलब्ध ठेवावा. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी गावांना भेट देऊन पाहणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

मॉन्सून कालावधीपूर्वी संबंधित विभागाने रस्ते, शाळा, समाज मंदिरे, सार्वजनिक इमारती यांची तपासणी करून वापरण्यास योग्य असल्याबाबतचा अहवाल सादर करावा. पावसाळ्यामध्ये साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात अशावेळी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार व्हावा यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी नगर परिषद, नगरपंचायत व ग्रामपंयातीने आपल्या क्षेत्रातील नाले, नाली साफसफाईची कामे करावी. सोबतच पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या संघटनांची बैठक घेऊन ते वापरत असलेल्या बोट बचाव यंत्रणांसाठी वापराबाबत उपलब्ध होतील, असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. 

नॅशनल हायवेमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नाही. नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी साचलेल्या ठिकाणचे मार्ग मोकळे करण्यात यावे. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणीपातळीवर विशेष लक्ष देऊन संजय सरोवर व बावनथडी प्रकल्प यांच्याशी संर्पकात राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद, नगरपंचायतचे मुख्याधिकारी व विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. 


इतर बातम्या
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
अलमट्टीवर आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा...कोल्हापूर : पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...
अकलूज नगरपालिकेच्या मागणीसाठी माळशिरसला...सोलापूर : अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहराला...अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी...
नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ; ... नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी...
टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्तनारायणगाव, जि. पुणे :  जुन्नर कृषी उत्पन्न...
‘एक गाव, एक वाण’साठी कारंजातील नऊ...वाशीम : राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी...
‘ताकारी’च्या लाभक्षेत्राची ड्रोनद्वारे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील...
खानदेशात पेरण्या रखडत; कमी पावसामुळे...जळगाव : खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत...
निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवकपरतूर, जि. जालना : यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस...
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन;...नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या...
उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक...