नाशिक येथे प्रहारचे जेलभरो आंदोलन

प्रहारचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन
प्रहारचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन

नाशिक : शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, विद्यार्थी, निराधार यांचे प्रलंबित प्रश्न व विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार (ता. ३१) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पीकविम्याची रक्‍कम तातडीने देणे, शेतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत कामांचा समावेश मनरेगात करावा, घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे, आदिवासींचे प्रलंबित वनहक्‍क जमीनपट्टे त्वरित वितरित करावे, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगांराचा समावेश करावा, कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, वाळलेल्या फळबागांना नुकसान भरपाई देण्यात यावी, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, खते व आर्थिक मदत द्यावी, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, मोबदला व नोकरी द्यावी, निराधार, विधवांना वार्षिक दहा हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळावी अशा मागण्यांकडे लक्ष्य वेधण्यात आले. या मागण्या मान्य करण्याकरिता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com