Agriculture news in Marathi, Prisoners should not ask what Pawar did: Sharad Pawar | Agrowon

तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की पवारांनी काय केले ः शरद पवार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता तुमचे तुम्ही बघा. मी घरी येणार नाही. आता मला काही लोकांकडे बघायचे आहे आणि पवारांनी काय केले, हे तुरुंगात गेलेल्यांनी तर अजिबात विचारू नये, मी आजवर अनेक बरी-वाईट कामं केली, पण कधी तुरुंगात गेलो नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी (ता. १७) येथे निशाणा साधला.

सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता तुमचे तुम्ही बघा. मी घरी येणार नाही. आता मला काही लोकांकडे बघायचे आहे आणि पवारांनी काय केले, हे तुरुंगात गेलेल्यांनी तर अजिबात विचारू नये, मी आजवर अनेक बरी-वाईट कामं केली, पण कधी तुरुंगात गेलो नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी (ता. १७) येथे निशाणा साधला.

मी वयाची ८० वर्षे पूर्ण केली, अशी सतत आठवण करून दिली जातेय, पण मी काय म्हातारा झालो नाही. मला अनेकांना घरी पाठवायचं आहे, ते या ठिकाणी उपस्थित तरुणाईच्या जोरावर, असे सांगत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी जोश आणताना पक्ष सोडून गेलेल्यांना फटकारेही मारले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरवात सोलापुरातून केली. यावेळी मुख्यमंत्री प्रचारात मश्‍गुल असल्याची टीका त्यांनी केली. किल्लारी भूकंपावेळी सकाळी सात वाजता मी किल्लारीला होतो, अशी आठवणही त्यांनी सांगितली. 

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बळीराम साठे, राजूबापू पाटील, माजी आमदार राजन पाटील, भारत जाधव, संतोष पवार उपस्थित होते. 

कर्जमाफीवर पवारांचे बोट 
शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांची स्थिती काय झाली असेल याचा विचार कधी कुणी केला आहे का? आम्ही ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. पण आजचे सरकार ऑनलाइन-ऑफलाइनच्या गप्पा मारत आहे, किती जणांचे कर्जमाफ झाले, हे अद्यापही सरकारला सांगता येत नाही, यावरही पवार यांनी बोट ठेवले.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...