जनतेला सिंचन प्रकल्प हवेत की बुलेट ट्रेन ः चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

आष्टा, जि. सांगली ः मुंबईसह महाराष्ट्रापुढे अनेक समस्या असताना बुलेट ट्रेनवर इतका खर्च का? बुलेट ट्रेनची खरी गरज मुंबईकरांना आहे, की अहमदाबादला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जनमत चाचणी घेऊन जनतेला सिंचन प्रकल्प हवेत की बुलेट ट्रेन, याचा अभ्यास करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.15) येथे पत्रकार परिषदेत केले.

बुलेट ट्रेनचा निर्णय अव्यवहार्य वाटतोय, असेही ते म्हणाले. ते येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""बुलेट ट्रेनसाठी सरकारला 90 टक्के सबसिडी द्यावी लागेल. प्रत्येक देशाने स्वतःच्या गुंतवणुकीवर बुलेट ट्रेन सुरू केली. ती कुठेही नफ्यात नाही. आपल्याकडे या बाबतचे कोणते स्ट्रक्‍चर आहे, की ती राबवली जात आहे. बुलेट ट्रेनवरील खर्च कोकण, पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे रेल्वे मार्ग, हायवे यावर करावा. त्याचा विकासासाठी फायदा होईल.''

ते म्हणाले, ""सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे. घोषणांचा पाऊस आहे. प्रत्यक्षात 5 ते 7 हजार कोटींची कर्जमाफी होईल का, अशी शंका आहे. कर्जमाफीच्या किचकट अटींनी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ऑनलाइनसारख्या जाचक अटींमुळे 5 ते 10 हजार रुपये कर्ज असणारे शेतकरी अर्ज भरण्यापासून दूरच असल्याचे दिसते. सरकारने कर्जमाफीचा आराखडा तयार करीत असताना पश्‍चिम महाराष्ट्राचा फायदा होणार नाही. केवळ विदर्भ, मराठवाड्याला लाभ होईल, अशी व्यवस्था केली आहे.'' प्रत्यक्ष कर्जमाफी 6-7 हजार कोटींची महाराष्ट्रातील कर्जमाफी योजना फसवी आहे. 34 हजार कोटींची घोषणा प्रत्यक्षात 6 ते 7 हजार कोटींचीच होईल. त्यातही ऑनलाइन अन्‌ किचकट अटींमुळे 5 ते 10 हजार रुपये कर्ज असणारे अनेक शेतकरी वंचित राहतील, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com