पूरग्रस्तांसाठी सरकारने जाहीर  केलेली मदत अपुरी ः पृथ्वीराज चव्हाण

शेतकऱ्यांची शेती संकटात आलेली आहे. त्यामुळे आमच्या सरकारने यापूर्वीच सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. अशी सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर  ः सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली प्रतिदिन ६० रुपयांची मदत व जनावरांसाठी दिवसाची शंभर रुपयांची मदत अपुरी आहे. ही मदत आणखीन वाढवावी लागेल. सरकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे, मात्र ही मदत समाधानकारक नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.  

शाहू मार्केट यार्ड येथे शाहू सांस्कृतिक मंदिरात जाधवाडी, बापट कॅम्प, कदमवाडी या परिसरांतील पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री. चव्हाण यांनी भेट दिली. या वेळी ते बोलत होते.  

श्री. चव्हाण म्हणाले, की २००५ ला पूर आल्यानंतर आमच्या सरकारने भविष्यात पुराची समस्या व धोका टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. त्याचे संदर्भ या सरकारने कोठेही वापरल्याचे दिसत नाही. येत्या काळात रोगराई पसरण्याची शक्यता विचारात घेऊन अधिक प्रभावीपणे उपाययोजना सरकारने राबवणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

श्री. चव्हाण म्हणाले, की मी कराडहून सकाळी निघालो. कोल्हापूरकडे येत असताना अजूनही वाटेत महामार्गावर व अन्य राज्य मार्गांवर पुराचे पाणी आहे. परिणामी वाहतूक ठप्प झालेली आहे. सरकार मदत करीत आहे, त्यासाठी काही मंत्री दौरेही करत आहेत. मात्र त्यामध्ये सुयोग्य नियोजन आणि सुसंवाद दिसत नाही. अशा स्थितीत मदतकार्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक होते, मात्र व्यवस्थापन करण्यातच यंत्रणांमध्ये सुसूत्रता नसल्याचे दिसते. अशा स्थितीत काही ठिकाणी मदत पोचली, काही ठिकाणी मदत पोचली नाही. अजूनही असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत. जनावरांच्या चाऱ्यापासून ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. लोकांचा जसा संसार वाहून गेला तसेच शेतीचेही नुकसान झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com