पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
ताज्या घडामोडी
शिवसेना आणि आमचे जुळू नये असा भाजपचा प्रयत्न ः पृथ्वीराज चव्हाण
मुंबई ः मुख्यमंत्रिपदाबाबत मी काहीही बोलणार नाही. सत्तावाटपाच्या सूत्राबाबत चर्चेने निर्णय होईल. शिवसेना आणि आमचे जुळू नये यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई ः मुख्यमंत्रिपदाबाबत मी काहीही बोलणार नाही. सत्तावाटपाच्या सूत्राबाबत चर्चेने निर्णय होईल. शिवसेना आणि आमचे जुळू नये यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयात शुक्रवारी (ता.१५) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर शिवसेनेशी औपचारिक चर्चा सुरू झाली. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आला, तेव्हा सोनिया गांधी यांनी यावर व्यापक चर्चा केली. मात्र, तेव्हा शिवसेना ‘एनडीए’चा घटक होता, त्यामुळे चर्चा करणे शक्य नव्हते. शिवसेना ‘एनडीए’मधून बाहेर पडल्यानंतर याबाबत गांभीर्याने चर्चा सुरु झाली आहे.
आधी सरकारमध्ये जायचे आणि नंतर चर्चा करायची हे शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेसने ढिसाळपणा दाखवला गेला. मात्र अशी टीका योग्य नसल्याचेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे आणि कोणते मुद्दे वगळायचे हे ठरवले जाईल. किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचे हेही या चर्चेत ठरवावे लागणार आहे. पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करावी लागेल. त्यासाठी आधी याबाबत आम्ही पक्षातंर्गत चर्चा करू. त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू. आणि त्यानंतरच सत्ता वाटप सूत्र आणि शिवसेनेला पाठिंबा याबाबत चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.