नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम बंद आंदोलन

येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पशुसेवा देत आहेत. त्यांना २२ सेवा करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी शासनाने द्यावी, या मागणीसाठी खासगी पशुसेवक पदविकाधारक संघाने गुरुवार (ता.२२) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
Private cattle breeders strike in Nashik district
Private cattle breeders strike in Nashik district

येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पशुसेवा देत आहेत. त्यांना २२ सेवा करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी शासनाने द्यावी,  या मागणीसाठी खासगी पशुसेवक पदविकाधारक संघाने गुरुवार (ता.२२) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील सुमारे ७५० पशूसेवक यात सहभागी झाले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांना येथील खासगी पशुसेवक पदविकाधारक संघाने निवेदन दिले. मागणीबाबत चर्चा केली. पदविका धारकांना भारतीय पशुवैद्य कायदा १९८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट पदविका धारकांच्या २२ कामांची स्वतंत्र परवानगी मिळावी, राज्यात १९७१ साली पदविका धारकांसाठी पशुवैद्यक परिषदेने पार्ट टू म्हणून केलेले नोंदणी पूर्ववत करावी, पशुसंवर्धन व्यवस्थापन या दोन वर्षाच्या अभ्यासक्रम धारकांना स्वतंत्र पशुवैद्यक परिषद स्थापन करून व्यवसाय नोंदणी मिळावी, पर्यवेक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

आंदोलनामुळे पशुधनाच्या उपचाराची अडचण होत आहे. खासगी पशुसेवक पदविकाधारक हे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या दारात सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई होऊ नये, अशी मागणी आहे. शासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही संघटनेने केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com