agriculture news in marathi Private cattle breeders strike in Nashik district | Page 2 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम बंद आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पशुसेवा देत आहेत. त्यांना २२ सेवा करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी शासनाने द्यावी,  या मागणीसाठी खासगी पशुसेवक पदविकाधारक संघाने गुरुवार (ता.२२) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पशुसेवा देत आहेत. त्यांना २२ सेवा करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी शासनाने द्यावी,  या मागणीसाठी खासगी पशुसेवक पदविकाधारक संघाने गुरुवार (ता.२२) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील सुमारे ७५० पशूसेवक यात सहभागी झाले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांना येथील खासगी पशुसेवक पदविकाधारक संघाने निवेदन दिले. मागणीबाबत चर्चा केली. पदविका धारकांना भारतीय पशुवैद्य कायदा १९८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट पदविका धारकांच्या २२ कामांची स्वतंत्र परवानगी मिळावी, राज्यात १९७१ साली पदविका धारकांसाठी पशुवैद्यक परिषदेने पार्ट टू म्हणून केलेले नोंदणी पूर्ववत करावी, पशुसंवर्धन व्यवस्थापन या दोन वर्षाच्या अभ्यासक्रम धारकांना स्वतंत्र पशुवैद्यक परिषद स्थापन करून व्यवसाय नोंदणी मिळावी, पर्यवेक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

आंदोलनामुळे पशुधनाच्या उपचाराची अडचण होत आहे. खासगी पशुसेवक पदविकाधारक हे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या दारात सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई होऊ नये, अशी मागणी आहे. शासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही संघटनेने केली.
 


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...