Agriculture news in marathi Private cotton shop closed with Marketing Federation, CCI in Parbhani | Agrowon

परभणीत पणन महासंघ, सीसीआयसह खासगी कापूस खरेदी बंदच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020


खाजगी कापूस खरेदीचे दर कमी होते. पणन महासंघाच्या केंद्रांवर रांगा होत्या. त्यामुळे १५ क्विंटल कापूस घरातच आहे. बाजार समितीत नोंदणी करायची राहिली आहे. येत्या खरिपात पेरणीची तजवीज करण्यासाठी पैशाची गरज आहे. त्यासाठी तत्काळ पणनची कापुस खरेदी सुरु करावी. 
- माणिकराव सूर्यवंशी, शेतकरी, सिंगणापूर, जि.परभणी 

कापुस खरेदी सुरु करण्यासाठी पाठविलेल्या ई-मेलची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत विभागास ई मेल पाठविण्यात आले. असा रिप्लाय मुख्यमंत्री कार्यालयाकडून आला आहे. 
- सत्यभामा लोहट, शेतकरी, मांडखळी, जि.परभणी. 
 

परभणी : लॅाकडाऊनमुळे राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ (फेडरेशन), भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी बंद आहे. उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे दर वाढतील या अपेक्षेने घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस खरेदी सुरु होण्याच्या हालचाली दिसत नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तत्काळ ही खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

शुक्रवार (ता.२० मार्च) पर्यंत जिलह्यात १९ लाख ६१ हजार १४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यात पणन महासंघाची ४ लाख ७८ हजार ६६५ क्विंटल, सीसीआयची ८ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल, तर खासगी व्यापाऱ्यांच्या ५ लाख ९३ हजार ९८३ क्विंटल कापूस खरेदीचा समावेश आहे. रुईच्या गाठी तसेच सरकी साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे महासंघाच्या कापूस खरेदीत अडथळे येत गेले. खुल्या बाजारातील दरात घसरण झाल्यामुळे पणन महासंघ आणि सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोजमापास विलंब होत असल्याने वाहन भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. 

खासगी खरेदी देखील गेल्या पंधराहून अधिक दिवसांपासून बंद आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरात सुधारणा होऊन फायदा होईल, या अपेक्षेने घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस साठवून ठेवलेला आहे. परंतु, आता तापमानात वाढ झाल्यामुळे ते धोकादायक झाले आहे. पणन महासंघ आणि सीसीआयकडून कापूस सुरु करण्याबाबत हालचाली दिसत नाहीत. खासगी कापूस विक्री सुरु झाली नाही. 
 
साडेतीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी 

पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी करावी लागत आहे. परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२५ गावांतील शेतकऱ्यांची नोंदणी तीन दिवस सुरु होती. त्यावेळी सुमारे साडेतीन हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली. लॅाकडाऊनमुळे नोंदणी बंद आहे. अन्य ठिकाणच्या बाजार समित्यात नोंदणी सुरु नाही. 
 


इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...