Agriculture news in marathi Private Diploma Holder, Livestock The movement of the supervisors is out of order | Page 2 ||| Agrowon

खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे आंदोलन नियमबाह्य

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

पशुसंवर्धन विभागातील खासगी पदविकाधारक व सरकारी पशुधन पर्यवेक्षक यांनी विविध मागण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू केले आहे. कामबंद केल्याने पशुपालकांची अडवणूक होत आहे.

मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी पदविकाधारक व सरकारी पशुधन पर्यवेक्षक यांनी विविध मागण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू केले आहे. कामबंद केल्याने पशुपालकांची अडवणूक होत आहे. हे आंदोलन नियमबाह्य असल्याचे पत्रक महाराष्ट्र राजपत्रित पशू वैद्यकीय संघटनेने प्रसिद्धीस दिले आहे. 

दरम्यान, राजपत्रित पशू वैद्यकीय संघटनेने केलेले सर्व आरोप दिशाभूल करणारे आहेत, असे राज्य पशू वैद्यकीय संवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ. सागर आरुटे यांनी सांगितले. 

 राजपत्रित संघटनेचे पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अतुल चिखले व पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद लोंढे म्हणाले, ‘‘शासनाने पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षक यांना कृत्रिम रेतन करणे, प्राथमिक उपचार, लसीकरण, पोट पुगी आदी २२ प्रकारच्या सेवा नोंदणीकृत पशुवैद्यकाच्या अनुपस्थित देण्याची परवानगी दिली आहे. तसेच मोठ्या गंभीर आजारात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने व औषध पत्रानुसार उपचार करण्यास परवानगी दिली आहे. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य यांनी सदर काम न करणाऱ्या पशुधन पर्यवेक्षक यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

खासगी पदविकाधारक ज्यांच्याकडे खरे पदविका प्रमाणपत्र आहे. त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक यांच्याशी संपर्क ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून २२ प्रकारच्या पशू वैद्यकीय सेवा व कृत्रिम रेतन करण्यास काहीही अडचण नाही. परंतु ज्यांनी बोगस पदविका प्रमाणपत्र खरेदी करून पशू वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार आहे.’’

 आरुटे म्हणाले, ‘‘राज्यात ५८ हजार खासगी पदविकाधारक व सात हजार शासकीय पशुधन पर्यवेक्षक संपावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनासाठी सेवा मिळत नाही. पदविकाधारक व पशुधन पर्यवेक्षक पशू वैद्यकीय सुविधा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन देतात. सध्या उपलब्ध असलेली पशुधनाची संख्या बारा कोटी आहे. सरकारी व खासगी पदवीधर डॉक्टर यांची संख्या फक्त ७ हजार ५०० आहे. ़अशा वेळी खासगी डॉक्टरांची मोठी मदत शेतकऱ्यांना होते.’’


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...