Agriculture news in marathi Private to diploma holders Let's do veterinary business | Page 2 ||| Agrowon

पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय करू द्या 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

 विदर्भ व्हेटरनरी अँण्ड डेअरी डिप्लोमा होल्डर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने सोमवारी (ता. २) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी नोंदणीकृत करण्याच्या प्रमुख मागणीसाठी विदर्भ व्हेटरनरी अँण्ड डेअरी डिप्लोमा होल्डर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने सोमवारी (ता. २) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी माजीमंत्री दशरथ भांडे उपस्थित होते. 

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पदविकाधारकांना सरकारी नोकरी नसली तरी खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अधिकृत नोंदणी मिळावी, महाराष्ट्रात पदविकाधारकांचे हित व संरक्षण जोपासण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरावर व्हेटरनरी कौन्सिल स्थापन करून त्या परिषदेमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांची निवड करावी. निवड करताना सरकारी नोकरी नसलेल्या पदविकाधारकांची निवड करावी.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत सध्या सुरू असलेल्या पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून सेमी इंग्रजी माध्यमातून १२ वी सायन्स नंतर किमान तीन वर्षांचा अभ्यासक्रम तयार करून संबंधितांना बीएव्हीएससी अँण्ड एएच पदवी अभ्यासक्रमाला द्वितीय वर्षात प्रवेश मिळावा. त्यासाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात, अशा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

संघटनेचे अध्यक्ष हरीराम भांडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्‍यक्ष सुजित बनोले, उपाध्यक्ष अमोल नवले, हरीश चोपडे, विशाल येवकार, अमोल मुगल, योगेश इंगळे, एकनाथ निघोट, संदीप गावंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...