राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे कर्जवाटप

राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२ परवानाधारक खासगी सावकार वाढले आहेत; तर दुसरीकडे २०१५-१६ च्या तुलनेत कर्जवाटपही दुप्पट झाले असून दरमहा १०० कोटींहून अधिक कर्जवाटप खासगी सावकारांकडून केले जाते
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे कर्जवाटप

सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२ परवानाधारक खासगी सावकार वाढले आहेत; तर दुसरीकडे २०१५-१६ च्या तुलनेत कर्जवाटपही दुप्पट झाले असून दरमहा १०० कोटींहून अधिक कर्जवाटप खासगी सावकारांकडून केले जाते, असे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी क्षेत्रातील बॅंकांकडून पुरेसे, वेळेत कर्ज मिळत नसल्याने गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागतात. सद्य:स्थितीत राज्यातील १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर खासगी सावकारांचा बोजा आहे. त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी सावकारांकडे गहाण (खरेदीखत) आहेत. त्यातून २०१९-२० मध्ये सहकार आयुक्‍तालयाकडे १७०हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये नागपूर व अमरावती विभागातून सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत; तर काही जिल्हा उपनिबंधकांनी काही शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी सावकारांच्या तावडीतून सोडविल्याही आहेत. तत्पूर्वी, राज्यातील सुमारे आठ ते दहा लाख शेतकरी दरवर्षी खासगी सावकारांकडून कर्ज घेत असल्याचेही सहकार आयुक्‍तालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. कर्जवाटपाची स्थिती (मार्च २०२० पर्यंत)

वर्ष   खासगी सावकार कर्जवाटप
२०१५  १२,०२२   ८९६.३४ कोटी
२०१६ १२,२०८   १,२५४.९७ कोटी
२०१७  १२,२१४  १,६१४.८० कोटी
२०१८    १२,६२९  १,७१७.३७ कोटी
२०१९ १२,७५४    १,७९१.१३ कोटी
२०२० १२,७६९   दरमहा १०० कोटी

​ राज्यात १२ हजार ७५४ परवानाधारक खासगी सावकार असून आता नव्याने १५ सावकारांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. दरवर्षी  सावकारांकडून सरासरी १०० कोटींचे कर्जवाटप केले जाते. दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध तक्रारीही वाढत असून, अमरावती व नागपूर विभागातून तक्रारींचा ओघ जास्त आहे. परवानाधारक सावकारांविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी धाडसाने पुढे यायला हवे. जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. - प्रदीप बर्गे, सहसंचालक, सहकार आयुक्‍तालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com