agriculture news in Marathi private sahuker distributes 100 crore loan per month in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे कर्जवाटप

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२ परवानाधारक खासगी सावकार वाढले आहेत; तर दुसरीकडे २०१५-१६ च्या तुलनेत कर्जवाटपही दुप्पट झाले असून दरमहा १०० कोटींहून अधिक कर्जवाटप खासगी सावकारांकडून केले जाते

सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२ परवानाधारक खासगी सावकार वाढले आहेत; तर दुसरीकडे २०१५-१६ च्या तुलनेत कर्जवाटपही दुप्पट झाले असून दरमहा १०० कोटींहून अधिक कर्जवाटप खासगी सावकारांकडून केले जाते, असे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी क्षेत्रातील बॅंकांकडून पुरेसे, वेळेत कर्ज मिळत नसल्याने गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागतात. सद्य:स्थितीत राज्यातील १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर खासगी सावकारांचा बोजा आहे. त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी सावकारांकडे गहाण (खरेदीखत) आहेत.

त्यातून २०१९-२० मध्ये सहकार आयुक्‍तालयाकडे १७०हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये नागपूर व अमरावती विभागातून सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत; तर काही जिल्हा उपनिबंधकांनी काही शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी सावकारांच्या तावडीतून सोडविल्याही आहेत. तत्पूर्वी, राज्यातील सुमारे आठ ते दहा लाख शेतकरी दरवर्षी खासगी सावकारांकडून कर्ज घेत असल्याचेही सहकार आयुक्‍तालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कर्जवाटपाची स्थिती (मार्च २०२० पर्यंत)

वर्ष   खासगी सावकार कर्जवाटप
२०१५  १२,०२२   ८९६.३४ कोटी
२०१६ १२,२०८   १,२५४.९७ कोटी
२०१७  १२,२१४  १,६१४.८० कोटी
२०१८    १२,६२९  १,७१७.३७ कोटी
२०१९ १२,७५४    १,७९१.१३ कोटी
२०२० १२,७६९   दरमहा १०० कोटी


राज्यात १२ हजार ७५४ परवानाधारक खासगी सावकार असून आता नव्याने १५ सावकारांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. दरवर्षी  सावकारांकडून सरासरी १०० कोटींचे कर्जवाटप केले जाते. दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध तक्रारीही वाढत असून, अमरावती व नागपूर विभागातून तक्रारींचा ओघ जास्त आहे. परवानाधारक सावकारांविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी धाडसाने पुढे यायला हवे. जेणेकरून त्यांना न्याय मिळेल.
- प्रदीप बर्गे, सहसंचालक, सहकार आयुक्‍तालय


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....