agriculture news in marathi, private sugarcane factories demand to start crushing season from one november, pune. maharashtra | Page 3 ||| Agrowon

गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची खासगी कारखान्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे : राज्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आग्रह खासगी साखर कारखान्यांनी धरला आहे. आतापर्यंत १६४ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. थकीत एफआरपी आता केवळ पावणेदोन टक्क्यावर आली आहे. 

पुणे : राज्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आग्रह खासगी साखर कारखान्यांनी धरला आहे. आतापर्यंत १६४ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. थकीत एफआरपी आता केवळ पावणेदोन टक्क्यावर आली आहे. 

साखर आयुक्तांच्या स्वाक्षरीने गाळपाचा परवाना दिला जातो. मात्र, सध्या आयुक्त शेखर गायकवाड हे हरियाना दौऱ्यावर आहेत. ते राज्यात आल्यानंतरच परवाना वाटप सुरू होईल. आतापर्यंत १६४ कारखान्यांनी अर्ज केलेले आहेत. मात्र, यातील बरेच अर्ज अर्धवट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे निश्चित किती कारखान्यांना बॉयलर पेटवण्यात रस आहे याचा अंदाज आलेला नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाने १ डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. खासगी कारखान्यांना मात्र १ नोव्हेंबरपासून हंगाम हवा आहे. यावर तोडगा म्हणून १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एफआरपीपोटी २२,९१५ कोटी दिले

२०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी ९५२ लाख टन ऊस खरेदी केला होता. शेतकऱ्यांना या खरेदीच्या मोबदल्यात २३ हजार २९३ कोटी अदा करण्याचे कायदेशीर बंधन कारखान्यांवर आहे. मात्र, साखर कारखान्यांनी आतापर्यंत २२ हजार ९१५ कोटी रुपये दिले आहेत. अद्याप ३९७ कोटी रुपये थकलेले असून, ही रक्कम एकूण एफआरपीच्या पावणेदोन टक्के आहे. 

आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, एफआरपी वसुलीसाठी आयुक्तालयाने आपल्या कक्षेतील सर्व नियम व अधिकाराचा वापर केल्यामुळेच वसुली ९८ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. १३८ कारखान्यांना १०० टक्के एफआरपी द्यावी लागली. ४५ कारखान्यांनी ८० ते ९० टक्के, तर आठ कारखान्यांनी ६० ते ७० टक्के एफआरपी दिलेली आहे. राज्यात केवळ तीन कारखाने असे आहेत की त्यांनी ४० टक्के एफआरपी थकविली आहे.

एफआरपी थकविल्याबद्दल ८२ कारखान्यांवर आरआरसी कारवाई केल्यामुळे हा विषय धसास लागला. अजूनही ५६ कारखान्यांनी एफआरपी चुकती केलेली नाही. कायद्याचा आधार घेऊन आयुक्तालयाकडून या कारखान्यांकडे सतत पाठपुरावा केला जात आहे. 
ऊस नियंत्रण कायद्यानुसार शेतकऱ्यांना १४ दिवसांत एफआरपीचे पेमेंट न केल्यास प्रतिवर्षी १५ टक्के व्याज देण्याचा आग्रहदेखील धरला जात आहे. त्यातून कोणत्याही कारखान्याला सूट देण्यात आलेली नाही.

आयुक्तांनी व्याजाबाबतदेखील ठाम भूमिका घेतल्यामुळे व्याज चुकविण्याचे प्रयत्नदेखील हाणून पाडण्यात आलेले आहेत. राज्यातील साखर कारखान्यांना सध्या गाळप परवाना देतानाच आता एफआरपी व व्याजाची अट पाळण्याचे बंधन लावले जात आहे.   
 
हंगाम लांबवणे त्रासदायक ठरेल ः ठोंबरे 
१ नोव्हेंबरपासून गाळप सुरू करणेच योग्य ठरेल, असे मत वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले. “पश्चिम महाराष्ट्राला पुराचा तडाखा दिल्यामुळे ऊस खराब झालेला आहे. उभा ऊस लवकर गाळला जावा असे तेथील शेतकऱ्यांना वाटते. विदर्भ, मराठवाड्यात पाऊस लवकर झाला नाही. त्यामुळे चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस गेला आहे. हंगाम लवकर सुरू न झाल्यास चाऱ्यासाठी ऊस जाईल, असे शेतकरी सांगत आहेत. उशिरा झालेल्या पावसामुळे काही भागामत शेतकऱ्यांना खोडवा काढून तेथे रब्बीची पिके घ्यायची आहेत. त्यामुळे १ डिसेंबरपर्यंत हंगाम लांबवणे त्रासदायक ठरेल, असे श्री. ठोंबरे यांनी स्पष्ट केले.


इतर अॅग्रो विशेष
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...