काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात

काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात अधिकृतरित्या केलेला हा प्रवेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करून काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी केली असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. प्रियंका गांधी प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वड्रा (वढेरा) यांच्या पत्नी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, आतापर्यंत प्रियंका यांनी राजकारण प्रवेशाचे संकेत दिले नव्हते. 'प्रियंका यांच्यामध्ये इंदिरा गांधी यांची छबी दिसते', अशीही चर्चा सुरू असते.

उत्तर प्रदेशचे मैदान जिंकणे ही लोकसभा निवडणुकीतील एक महत्त्वाची बाब असते. हीच बाब ओळखून गेल्या निवडणुकीमध्ये खुद्द नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधून जागा लढविली होती. याचा सकारात्मक परिणाम होत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळाले होते. आता लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ''माझी बहिण प्रियंका उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकांमध्ये माझ्या बरोबर असेल, याचा मला खूप आनंद आहे. ती अत्यंत सक्षम आहे,'' अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com