agriculture news in marathi, prize declaration pending of jalyukat shivar scheme, nagar, maharashtra | Agrowon

तीन वर्षांपासून ‘जलयुक्त’चे पुरस्कार रखडले 
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

नगर  ः दुष्काळमुक्तीसाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात अनेक गावांनी प्रभावीपणे जलसंधारणाचे काम केले. मात्र, चांगले काम करणाऱ्या गावांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची शासनाची घोषणा प्रत्यक्षात दूरच राहिली आहे. या अभियानातील गावे, संस्थांचे तब्बल तीन वर्षांचे पुरस्कार रखडले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

नगर  ः दुष्काळमुक्तीसाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात अनेक गावांनी प्रभावीपणे जलसंधारणाचे काम केले. मात्र, चांगले काम करणाऱ्या गावांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची शासनाची घोषणा प्रत्यक्षात दूरच राहिली आहे. या अभियानातील गावे, संस्थांचे तब्बल तीन वर्षांचे पुरस्कार रखडले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

पुरस्काराबाबत चौकशी केल्यानंतर जलयुक्तसाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या कृषी आणि जलसंधारण विभागातही त्याबाबत समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे. लोक मात्र आमच्या गावाला पुरस्कार मिळणार का? याची विचारणा करत कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र, काहीही माहिती नसल्याने आलेल्यांना काय उत्तरे द्यावी, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे.  

दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाची कामे करण्यासाठी २०१५ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले. कृषी विभागाची योजनेसाठी मुख्य समन्वयाची भूमिका आहे. सतत तीन वर्ष टॅंकरने पाणीपुरवठ्यासह दुष्काळाच्या निकषानुसार जलयुक्तसाठी गावे निवडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाचा राज्यासह देशभरात गवगवा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभियानाची दखल घेतली. या योजनेसाठी लोकसहभागही वाढला असल्याने योजनेतून जलसंधारणाच्या कामाला अधिक गती मिळाली.  

या अभियानात प्रभावी कामे करणाऱ्या गावांचा जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर गौरव करण्यासाठी पुरस्कार देणार असल्याची घोषणा करण्यात आली. पहिल्या वर्षीचे (२०१५) चे पुरस्कार वितरण झाले. तेही घाईतही केले गेले. त्यानंतर २०१६, १७ या वर्षासाठीचे प्रस्ताव मागवले. कृषी विभागामार्फत गावांचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव गेले. परीक्षण झाले. मात्र, त्यानंतर त्या प्रस्तावाचे काय झाले, याची माहिती कृषी विभाग, माहिती कार्यालयाकडे व प्रशासनाकडेही नाही. समन्वय कृषी विभागाकडे असले तरी पुरस्कार वितरणाचे नियोजन व अन्य बाबी जलसंधारण विभाग करते. त्यांनाही याबाबत माहिती नाही. प्रस्ताव मुंबईत आहेत एवढेच ठेवणीतले उत्तर मिळत आहे. विशेष म्हणजे २०१८ या वर्षासाठी अजून प्रस्तावच मागवले नाहीत. 

वशिलेबाजी तर होणार नाही ना?
जलयुक्त शिवार अभियानाचे पहिल्या वर्षीचे पुरस्कार दिले, त्या वेळी गावांसह अन्य पुरस्कारात वशिलेबाजी झाल्याचा आरोप त्या वेळी काही गावांनी केला. आता तीन वर्षांचे पुरस्कार रखडले आहेत. या वेळी प्रभावी कामे करणाऱ्या गावांचे नागरिक पुरस्कारात आपल्या गावांचा क्रमांक लागेल का, कधी जाहीर होणार आहेत, असा प्रश्न करतानाच यंदा वशिलेबाजी तर होणार नाही ना, असे प्रश्‍नही अधिकाऱ्यांना विचारत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...