agriculture news in marathi, prize distribution ceremony, pune, maharashtra | Agrowon

कृषी पदवीधरांनी शासनाला सूचना कराव्यात ः राधाकृष्ण विखे पाटील
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

पुणे  ः राज्यात आठ हवामान आधारित विभाग  आहे. पाऊस कमी होत आहे. राज्यात दुष्काळ पडत आहे. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. या स्थितीचे कृषी क्षेत्रातील पदवीधरांनी एकत्र येऊन चिंतन करण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीतही कृषी पदवीधर तरुणांची उमेद वाढली आहे. सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पदवीधरांनी एकत्र येऊन शासनाला सूचना केल्या पाहिजे, असे मत माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

पुणे  ः राज्यात आठ हवामान आधारित विभाग  आहे. पाऊस कमी होत आहे. राज्यात दुष्काळ पडत आहे. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. या स्थितीचे कृषी क्षेत्रातील पदवीधरांनी एकत्र येऊन चिंतन करण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीतही कृषी पदवीधर तरुणांची उमेद वाढली आहे. सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पदवीधरांनी एकत्र येऊन शासनाला सूचना केल्या पाहिजे, असे मत माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

कृषी पदवीधर संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता. ७) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. त्या वेळी श्री. विखे पाटील बोलत होते. या वेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस, सौरभ शेट्टी, प्रशांत नाईकवडी आदी उपस्थित होते.   

विखे पाटील म्हणाले, की कृषिमंत्री असताना खात्यात ३२ हजार कर्मचारी होते. त्या वेळी कृषी अधिकारी स्वतःच्या शेतात काय करतात याची माहिती मागविली होती. त्यामागे कृषी अधिकारी शेतीही चांगली करतात का हे पाहणे हा मुख्य उद्देश होता. परंतु अजूनही माहिती मिळाली नाही. आज नवीन पदवीधर कृषी उद्योग क्षेत्रात उतरत आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी आम्ही कृषी कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कंपन्या स्थापन झाल्या आहेत. कृषी पदवीधरांनी गट तयार केले पाहिजे. शासन ही एक व्यवस्था आहे. त्यांच्याकडून सर्व गोष्टी होऊ शकणार नाही. दुर्दैवाने सर्वच जण शासनाकडे बोट दाखवतात. 

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, की साखर कारखान्यांनी एफआरपीपोटी आतापर्यंत २३ हजार कोटी रुपये म्हणजेच ९३ टक्के रक्कम दिली आहे. मी सुद्धा कृषी पदवीधर आहे. कृषी विद्यापीठे ही पांढरा हत्ती आहे, असे म्हटले जाते. मात्र याच कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन आमच्यासारखे अधिकारी काम करत आहेत. कृषी पदवीधरांनी कोणत्याही एका व्यवसायाचा अजेंडा घेऊन काम केले पाहिजे. पुढील तीस वर्षांचा विचार करून काम करण्याची गरज आहे. साखर उद्योगात अडचणी आहेत. मात्र त्यापुढे जाऊन काही कारखान्यांनी पुढाकार घेऊन रिटेलर पद्धतीने साखर विक्री केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसे मिळू लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सियाम कडून पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचे...औरंगाबाद  : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...