कोल्हापुरात बिलांअभावी दुग्धोउत्पादकांची अडचण

गेल्या तीन महिन्यात पशुखाद्यांच्या दरात पोत्यामागे शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाली. याचा फटका बसत आहे. अगोदर शेतीतील उत्पादन घटल्याने नुकसान होत आहे. यातच या संकटाने दुग्ध व्यवसाय करणे अडचणीचे बनले आहे. - रुपेश पाटील, संभाजीनगर, जि.कोल्हापूर
Problem of milk producers in Kolhapur due to lack of bills
Problem of milk producers in Kolhapur due to lack of bills

कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत नसल्याने दुग्धोउत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. कोविडमुळे दुधाचा खप होत नाही. त्यामुळे अनेक दुध संघांना दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत दुध बिले देणे अशक्‍य झाले आहे. काही नामवंत दुध संघ सोडले, तर अन्य दुध संघांची दुध बिले आठवड्याच्या विलंबाने निघत आहेत. याचा फटका दुग्धोत्पादकांना बसला आहे.

जिल्ह्याचे विविध दुध संघांचे दुध संकलन ११ लाख लिटरच्या पुढे आहे. गावपातळीवरील दुध संस्थांना शिल्लक रक्कमेतून उत्पादकांना बिले द्यावी लागत आहेत.

गेल्या तीन महिन्यांत कोविडमुळे शहरी बाजारपेठा बंद राहिल्या. याचा परिणाम दुध विक्रीवर झाला. त्याचा थेट फटका आता उत्पादकांना बसत आहे. जिल्ह्यात म्हैस उत्पादकाला ५.५ फॅटला ३६.५० रुपये दर मिळतो. म्हशींचे फॅट सरासरी ६ ते ६.५ च्या दरम्यान असल्याने उत्पादकाला साधारणत: प्रति लिटर चाळीस ते एकेचाळीस रुपये दर मिळतो. गायीच्या दुधाला ३.० फॅटला २५.५० रुपये दर दिला जातो.

कोविडची साथ सुरु होइपर्यत पशुखाद्याचे दर वाढले नव्हते. पण, सर्वच व्यवहार थांबल्याने पशुखाद्य तयार करण्यासाठीचा कच्चा माल थांबला. याचा परिणाम पशुखाद्याच्या दर वाढीवर झाला. सरकी पेंडेसहित अन्य पशुखाद्याच्या दरात पन्नास किलोमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे दुग्धोत्पाकाचे कंबरडे मोडले. कोविडच्या साथीमध्ये शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायावरच मोठी भिस्त आहे. पशुखाद्याच्या दर वाढल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यसाय करणे जिकीरीचे झाले आहे. मार्चमध्ये दुध संघांची विक्री तीस टक्‍यांनी घटली.

मध्यंतरी अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने पुन्हा विक्रीत पाच ते दहा टक्कयापर्यंत वाढ झाली. परंतु, आता पुन्हा शहरामध्ये लॉकडाऊन होत असल्याने दुध संघांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या खासगी दुध व्यवसायिक व दुध संघ वगळता दुध संकलन नियमित आहे. तरीही पुन्हा लॉकडाऊन झाल्यास मोठे संघही दुध खरेदी दर कमी करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक आणखी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com