agriculture news in Marathi, problem solve of pesticide qualification, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटला

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट टाकल्यामुळे तयार झालेला तिढा अखेर दोन वर्षांनंतर सुटला. आता केवळ तीन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करताच विक्रेत्याला कायमस्वरूपी परवाना मिळणार आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सह सचिव अतीश चंद्रा यांनी अधिसूचना काढून हा प्रश्न निकालात काढला आहे. पदवीच्या अटीला देशात सर्वप्रथम माफदा अर्थात महाराष्ट्र ॲग्रो इनपुट एन्ड फर्टिलायझर्स डीलर असोसिएशनने कडाडून विरोध केला होता.

पुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट टाकल्यामुळे तयार झालेला तिढा अखेर दोन वर्षांनंतर सुटला. आता केवळ तीन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करताच विक्रेत्याला कायमस्वरूपी परवाना मिळणार आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सह सचिव अतीश चंद्रा यांनी अधिसूचना काढून हा प्रश्न निकालात काढला आहे. पदवीच्या अटीला देशात सर्वप्रथम माफदा अर्थात महाराष्ट्र ॲग्रो इनपुट एन्ड फर्टिलायझर्स डीलर असोसिएशनने कडाडून विरोध केला होता.

माफदाचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी हा प्रश्न केंद्र शासनासमोर मांडला. त्यानंतर आता अखिल भारतीय फर्टिलायजर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी पाठपुरावा केल्यामुळे केंद्राला आपली भूमिका बदलावी लागली. 

कीडनाशके नियम १९७१ च्या दहाव्या कलमानुसार कीडनाशकांची विक्री, वितरण, साठवणूक किंवा प्रदर्शन करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी संबंधित व्यक्तीकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी शास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायन, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र यापैकी एका विद्याशाखेची पदवी बंधनकारक आहे. 

देशातील बहुतेक राज्यांमध्ये वर्षानुवर्षे कीडनाशके विक्री व्यवसाय करणारे विक्रेते पदवीधारक नाहीत. त्यामुळे या समस्येला पर्याय म्हणून एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा दुसरा पर्यायदेखील देण्यात आलेला होता. 

पदविका पूर्ण करण्याचा पर्याय केंद्र शासनाने २०१७ मध्ये दिला. मात्र, त्यानंतर देखील हजारो विक्रेते पुन्हा अडचणीत आले. कारण, पदविका अभ्यासक्रमाला असलेली वयाची अट उलटून गेलेली होती. हजारो विक्रेत्यांचे वयोमान ४५ वर्षांच्या पुढे आहे. त्यामुळे हा गुंता सुटत नव्हता. केंद्राने आता अशा विक्रेत्यांसाठी केवळ तीन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला तरी परवाना देण्याचा तिसरा पर्याय देखील खुला केला आहे.

सामेतीमार्फत प्रशिक्षण
राज्याच्या कृषी व्यवस्थापन व विस्तार प्रशिक्षण संस्थेत (सामेती) आठवड्यातून केवळ एक दिवस प्रशिक्षण देणारा व एकूण बारा आठवडे चालणारा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आता कीडनाशके विक्रेत्यांना मिळू शकेल. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, हैद्राबादमधील मॅनेज संस्था, केंद्र शासनाची एनआयडीपीआर संस्था देखील प्रशिक्षण देऊ शकेल, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...
भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढकोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या...
वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर...पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात...
`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस...नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय)...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...