पीकविम्यासाठी मुदत वाढली, पण ऑनलाइन अडचणी कायम

एकतर सातबारेच निघत नाहीत, निघाले तर तलाठ्याची सही घ्यावी लागते. तलाठ्याकडे दोन गावांचा अतिरिक्‍त चार्ज, एवढं करून कागदपत्रं जमा केली त सेवा ठप्प. शेतातली कामं करावं का, विमा उतरविण्यासाठी रांगेत लागावं, काही कळनां. - संतोष बोंद्रे, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद
पीकविम्यासाठी मुदत वाढली, पण ऑनलाइन अडचणी कायम
पीकविम्यासाठी मुदत वाढली, पण ऑनलाइन अडचणी कायम

औरंगाबाद: विमा उतरविण्यासाठी मुदत वाढली, पण आॅनलाइन सेवेचं रडगाणे कायम आहे. त्यामुळे मुदत कितीही वाढविली तरी सेवाच चांगली नाही अन्‌ ऑफलाइन विमा स्वीकारण्याचा निर्णय नाही,  त्यामुळे मुदत वाढवून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.  दरम्यान, मंगळवारी (ता.२४) आपला विमा उतरविला जावा म्हणून शेतकऱ्यांनी विविध सेवा केंद्र व बॅंकांमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.  कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला विम्याचं सुरक्षा कवच मिळविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. असे असतानाचा सर्व्हर डाउनने मात्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला दिसत नाही. गतिमान व शाश्वत व्यवस्थाच नसताना ऑनलाइन विमा उतरविण्याचा आग्रह कशासासाठी, असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत. विमा उतरविण्याच्या पहिल्या मुदतीनुसार २४ जुलै ही शेवटची तारीख होती. आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे, परंतु गतवर्षी वाढीव  मुदतीत विमा उतरविणाऱ्या विमा परतावा न मिळाल्यामुळे यंदाही वाढीव मुदतीत विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना परताव्यास पात्र ठरलो तर विमा मिळेल की नाही, ही अशी शंका वक्त करत आहेत. त्यामुळे मंगळवारी विविध बॅंक शाखा व सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी सकाळीच गर्दी केली.  मंगळवारी सकाळी थोडा वेळ साइट चालली नंतर पुन्हा साइट बंद पडल्याची माहिती काही केंद्रचालकांनी दिली. शिवाय इंटरनेट सेवाही ठप्प झाल्याने विमा उतरविण्यात अडचण निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आडूळ येथील सहकारी बॅंकेच्या शाखेत सोमवारी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विमा उतरविण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले, परंतु मंगळवारी पुन्हा सेवा ठप्प झाली. विमा उतरविण्याची सोय असलेल्या सेवा केंद्रचालकांना आपल्याकडील काही रक्‍कम पोर्टलवर भरून ठेवावी लागते, परंतु सेवाच मिळत नसल्याने ती रक्‍कम निरर्थक अडकून पडल्याची माहिती एका केंद्रचालकाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com