Agriculture news in marathi, Problems facing livestock keepers due to lumpy skin disease in Nashik district | Page 4 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगामुळे पशुपालकांसमोर अडचणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

नाशिक : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १८ हजारांवर जनावरे बाधित होती. त्यापैकी ९ हजार जनावरे बरी झाली आहेत. आतापर्यंत २ लाख १५ हजारावर जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

नाशिक : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १८ हजारांवर जनावरे बाधित होती. त्यापैकी ९ हजार जनावरे बरी झाली आहेत. आतापर्यंत २ लाख १५ हजारावर जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी लस आणि वैद्यकीय सेवा शासकीय यंत्रणेकडून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे. यात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात संसर्गजन्य लम्पी प्रादुर्भावग्रस्त जनावरे आढळत आहेत. त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, मालेगाव, इगतपुरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये प्रादुर्भाव अधिक आहे. येवला, कळवण तालुक्यातील काही भागातही रोगाचा प्रादुर्भाव पसरताना दिसतो आहे. त्यात लस वेळेवर मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे वेगळा निधी नाही. त्यामुळे त्यांनी सेवा शुल्कातून जमा झालेल्या रकमेतून लसी खरेदी करण्याचे निर्देश तालुका पातळीवर दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून लम्पी त्वचारोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणासाठी ग्रामनिधीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाबूराव नरवाडे यांनी दिली. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे. सेवा पुरवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव वाढत आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करूनही पशुवैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय पातळीवरील कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यामुळे पशुपालकांना सेवा पुरविल्या जात नाहीत. संपर्क करूनही टाळाटाळ केली जात आहे. यावर लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष द्यावे.
- हिरामण आव्हाड, पशुपालक, वडगाव सिन्नर, ता. सिन्नर

लस कमी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेद्वारे ग्रामपंचायत निधीतून १५ हजार खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. सेवा मिळत नसल्यास पशुपालकांनी कळवावे.
- विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक


इतर बातम्या
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...