सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे प्रश्न सुटणार

पाणंद रस्त्यासाठी आलेल्या प्रस्तावासाठी तालुकास्तरावर छाननी करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. अंमलबजावणीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम हाती घेतले आहे. - ऋषीकेश शेळके, तहसीलदार, विटा.
Problems of farm, paanand roads will be solved in Sangli district
Problems of farm, paanand roads will be solved in Sangli district

लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेत. शासनाने यावर तोडगा काढत शेत, पाणंद रस्ता ही योजना अमलात आणली आहे. त्यातून तयार होणाऱ्या शेत, पाणंद रस्त्यांमुळे शेतीतील कामांसाठी आवश्‍यक साधनांची ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. 

यांत्रिकीकरणामुळे शेतकरी शेतीत पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इतर कामे यंत्रामार्फत करू लागले आहेत. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यात शेत, पाणांद रस्ते सुस्थितीत असणे गरजेचे आहे. ते पावसाळ्यात पाणी व चिखलाने वाहतुकीच्या कामास निरुपयोगी ठरतात, अशा ठिकाणी ने-आण करण्यास शेत, पाणंद रस्त्यांची आवश्‍यकता असते. त्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले होते. ते निकाली काढण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.

ग्रामीण भागातील शेतीचे प्रश्न वाढत आहेत. तहसीलदार कार्यालयाच्या यंत्रणेवर ताण वाढत आहे. ते कमी करण्यास शेत, पाणंद रस्त्याची योजना अमलात आणली आहे. हा प्रश्न तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर सोडवण्यात येईल. त्यासाठी स्थानिक प्रशासनानेही कंबर कसली आहे.

शेत, पाणंद रस्ते योजनेत धरण्यात आलेल्या रस्त्यांची काय अवस्था आहे, याचा आढावा बर्गे यांनी घेतला. शेत, पाणंद कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे, अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे, शेत - पाणांद रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा पक्का रस्ता एकत्र करणे, या कामांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com