डिजिटल इंडियात वाढल्या शेतकऱ्यांच्या अडचणी ः आमदार कडू

डिजिटल इंडियात वाढल्या शेतकऱ्यांच्या अडचणी ः आमदार कडू
डिजिटल इंडियात वाढल्या शेतकऱ्यांच्या अडचणी ः आमदार कडू

सेवाग्राम, वर्धा  ः डिजिटलचा बागूलबुवा उभा करीत भाजप सरकारने शेतकऱ्यांना ठिकठिकाणी रांगेत उभे केले. शेतकऱ्यांच्या अडचणींची जाण न ठेवता कर्जमाफीसारख्या गंभीर विषयावर देखील त्यांची होरपळच केली, असा आरोप प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला.  हमदापूर येथील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात जनशक्‍ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी परिषदेत ते बोलत होते. यावेळी गजानन कुबडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष जयंत तिजारे, माजी जिल्हाध्यक्ष देवा धोटे, विकास दांडगे, प्रमोद म्हैसकार, अजय खेडेकर, रॉबिन हूड, हितेश बनसोड, संदीप चांभारे, दिनेश गलांडे यांची उपस्थिती होती. आमदार कडू म्हणाले, की शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे भासवीत भाजपकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, अशा आशयातील ही कर्जमाफी पुढे पुढे ठरली. दीड लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार होते. त्याकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्यावर असलेले उर्वरित कर्ज आधी चुकवावे लागणार होते. शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करता आले असते तर ते थकबाकीदार झाले असते का? हा साधा विचार ही भाजपच्या नेत्यांना पडला नाही. ऑनलाइन प्रक्रियेत शेतकऱ्यांचा बराचवेळ खर्ची घातल्या गेला. त्यानंतर ग्रीन, यलो अणि इतर अनेक याद्या प्रकाशित करून त्यात त्यांना गुंतवून ठेवण्यात आले. अशा प्रकारे कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांचा नुसता खेळ करण्यात आला. त्यानंतरही शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच राहिले.  या वेळी महाविकास आघाडीने कोणत्याही निकषाविना दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. अशाच प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीची गरज असून त्यातूनच शेतकऱ्यांचे व्यापक हित साधणे शक्‍य होणार आहे. गेल्या सरकारची तानाशाही होती पण या सरकारची शिवशाही आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तर कर्जमाफीची गरजच पडणार नाही, असेही आमदार कडू म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com