ग्रामसेवकांचे प्रश्न तातडीने सोडविणार ः मुश्रीफ

राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता.१४) बैठक झाली.
ग्रामसेवकांचे प्रश्न तातडीने सोडविणार ः मुश्रीफ Problems of Gram Sevaks to be solved immediately: Mushrif
ग्रामसेवकांचे प्रश्न तातडीने सोडविणार ः मुश्रीफ Problems of Gram Sevaks to be solved immediately: Mushrif

अकोला : राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता.१४) बैठक झाली. ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे त्यांनी ग्रामविकास खात्याचे सचिव आणि उपसचिवांना निर्देश दिले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सचिव प्रशांत जामोदे यांनी दिली आहे.  ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांचे एकत्रीकरण करून पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती करावी, अशी मागणी केली. दोन्ही पदे एकत्र केल्यावर आहे त्या वेतनावर संरक्षण देऊन समिती गठन होऊन या कमिटीच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी लागू करावी, असेही सांगितले. यावर मंत्र्यांनी सदर प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे सचिवांना निर्देश दिले. समितीचे गठण तत्काळ करण्यात यावी, ही संघटनेची भूमिका मान्य केली आहे.  आधुनिक युगामध्ये ऑनलाइन युगामध्ये ग्रामसेवक सक्षम असावा, समर्थ असावा. म्हणून ग्रामसेवकांची शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेची पदवीधर करावी, ग्रामसेवक संवर्गाकडे ग्रामविकास विभागाव्यतिरिक्त अन्य विभागाची कामे ग्रामविकास विभागाची परवानगी न घेता लादले जातात, ती कामे तत्काळ कमी होणे, ग्रामपंचायत ग्रामसेवक धोरणानुसार राज्यात पाच हजार ग्रामसेवक पदनिर्मिती, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ४९ मध्ये सुधारणा, राज्य ग्रामसेवक युनियनचे महाअधिवेशन घेणे,

कोरोना कालावधीमध्ये ५१ मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांच्या वारसाला विमा कवच, केंद्र सरकारचे नवीन पेन्शन धोरण आणि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नंतर उशिरा नेमणूक झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे, ग्रामसेवकांना मुख्यालय वास्तव्याची ग्रामसभेच्या ठरावाची अट, भंडारा जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवकांच्या खंड सेवाकाळ शासन नियमानुसार सेवा कायम करणे, अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ढाकणे, जामोदे यांच्यासह मानद अध्यक्ष भास्करराव जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख बापूसाहेब अहिरे, पुणे विभाग विभागीय सहसचिव आर. डी. पाटील, राज्य संघटक विलासराव खोब्रागडे उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com